आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • CISCE Board Releases 10th 12th Results, 99.33% Of 10th And 96.84% Students Pass 12thCISCE

CISCE बोर्ड 2020 निकाल:CISCE बोर्डाने जाहीर केले 10 वी-12 वीचे निकाल, 10 वीचे 99.33% आणि 12 वीमध्ये 96.84% विद्यार्थी झाले उत्तीर्ण

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

 काऊन्सिल फॉर इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशन (सीआयएससीई) शिक्षण मंडळाचा दहावीचा (आयसीएसई) आणि बारावीचा (आयएससी) निकाल संकेतस्थळावर जाहिर करण्यात आला. दहावीच्या परीक्षेत 99.33 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. तर बारावीच्या परीक्षेचा निकाल 96.84 टक्के लागला आहे. विद्यार्थी आयोगाच्या www.cisce.org या संकेतस्थळावर विद्यार्थी निकाल पाहू शकतील. यंदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता बोर्डाचे उर्वरित पेपर रद्द करत सरासरी गुण देण्याचा निर्णय झाला होता. यामुळे काही विद्यार्थ्यांमध्ये नाराजी  देखील होती. परंतु विद्यार्थी सुरक्षा देखील महत्त्वाची आहे. यंदाच्या निकालातील महत्त्वाची बाब म्हणजे सीआयएससीईने गुणवत्ता यादी जाहिर केलेली नाही. अशी माहिती शिक्षकांनी दिली.

गेल्या वर्षी निकाल 7 मे रोजी आला होता. परंतु यावर्षी कोरोना लॉकडाऊनमुळे जुलैमध्ये निकाल लागला. फेब्रुवारी-मार्चमध्ये सुरू झालेल्या सीआयएससीई परीक्षा कोरोनामुळे 19 मार्च नंतर थांबविण्यात आल्या. ज्यानंतर न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेनंतर परिक्षा रद्द करण्यात आल्या. तसेच, निकालावर नाराज असलेले विद्यार्थी 16 जुलैपर्यंत पुनर्मूल्यांकनासाठी अर्ज करू शकतात. यासाठी विद्यार्थ्याला प्रत्येक पेपरसाठी 1000 रुपये फी भरावी लागेल.

0