आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासीआयएससीई बोर्डाने रविवारी निकाल जाहीर केले. दहावीत ९८.९४% व बारावीत ९६.९३% विद्यार्थी उत्तीर्ण झाले. दहावीच्या परीक्षेत ९ विद्यार्थ्यांनी ९९.८०% गुणांसह अव्वल स्थान पटकावले. तर बारावीच्या ५ विद्यार्थ्यांनी ९९.७५% गुण मिळवत पहिला क्रमांक मिळवला. काैन्सिल ऑफ द इंडियन स्कूल सर्टिफिकेट एक्झामिनेशनच्या (सीआयएससीई) दहावी व बारावीच्या परीक्षेला यंदा जवळपास २.५ लाख विद्यार्थी बसले होते. सीआयएसईसीचे सचिव गॅरी अराथून म्हणाले, मुलींनी दोन्ही परीक्षांत मुलांना मागे टाकले आहे.
बारावीतील टॉप ५ विद्यार्थी रिया अग्रवाल, इप्शिता भट्टाचार्य, मोहंमद आर्यन तारिक, शुभमकुमार अग्रवाल आणि मान्या गुप्ता.
दहावीतील टॉप ९ विद्यार्थी रुशील कुमार, अनन्या कार्तिक, श्रेया उपाध्याय, अद्वय सरदेसाई, यश मनीष भसीन, तनय सुशील शहा, हिया सांघवी, अविशी सिंह आणि संबित मुखोपाध्याय. १२वीत ९६.९%, तर १०वीत ९८.९% उत्तीर्ण
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.