आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Cji's Statement On Honor Killing; Intercaste Marriage Lead To Killings | Dhananjay Chandrachud

'ऑनर किलिंग'वर सरन्यायाधीशांचे भाष्य:चंद्रचूड म्हणाले - प्रेमसंबंध आणि आंतरजातीय विवाहामुळे होतात हत्या

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी प्रेमप्रकरण आणि आंतरजातीय विवाह हे देशातील ऑनर किलिंगचे कारण असल्याचे म्हटले आहे. देशात दरवर्षी शेकडो तरुणांचे प्रेमप्रकरण किंवा अन्य जातीतील लग्नामुळे बळी जातात, असे ते म्हणाले. याबाबत त्यांनी दु:खही व्यक्त केले.

माजी ऍटर्नी जनरल अशोक देसाई यांच्या 90 व्या जयंतीनिमित्त मुंबईत आयोजित कार्यक्रमात न्यायमूर्ती चंद्रचूड बोलत होते. ते म्हणाले की, नैतिकता ही अशी संकल्पना आहे, जी व्यक्तीपरत्वे बदलते.

1991 च्या एका लेखाचा संदर्भ
डी. वाय. चंद्रचूड यांनी 1991 च्या एका लेखाचा संदर्भ दिला. 1991 मध्ये उत्तर प्रदेशमध्ये एका 15 वर्षांच्या मुलीची तिच्या पालकांनी हत्या केली. गावकऱ्यांनीही ते स्वीकारले. कारण, त्याच्यामते मुलीने समाजाविरुद्ध पाऊल उचलले होते. सामर्थ्यवान लोकांनी बनवलेल्या समाजाचे पालन हे दुर्बल घटक करतात. हे नियम त्या लोकांच्या परंपरांच्या विरुद्ध आहेत. शक्तिशाली लोक निर्णय घेतात. ते नैतिक मानले जाते. दुर्बल घटक इतके दाबले जातात की ते स्वतःचे नियम बनवू शकत नाहीत.

HC किंवा SC साठी कोणतेही प्रकरण हे मोठे किंवा लहान नसते
न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी कार्यक्रमादरम्यान पुनरुच्चार केला की न्यायालयासाठी कोणतीही गोष्ट लहान किंवा मोठी नाही. मग ते जिल्हा न्यायपालिका असो वा उच्च न्यायालय किंवा सर्वोच्च न्यायालय. न्यायालयासाठी प्रत्येक खटला महत्त्वाचा आहे. लोक त्यांच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी न्यायालयांवर विश्वास ठेवतात.

जिल्हा न्यायाधीश भीतीमुळे जामीन देत नाहीत

जिल्हा न्यायाधीश क्रूर गुन्ह्यांतही जामीन देण्यास कचरतात. यामुळेच उच्च न्यायालयांत जामीन याचिकांचा डोंगर वाढला आहे, असे विधान भारताचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी केले आहे. ते बार काउंसिल ऑफ इंडियाने आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात बोलत होते. यावेळी कायदा मंत्री किरण रिजीजूही उपस्थित होते. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

खटल्याला विलंब झाल्याच्या वृत्तावर न्या. चंद्रचूड संतापले

सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूत्री डी. वाय.चंद्रचूड एका याचिकेच्या लिस्टिंगच्या मुद्यावर चांगलेच नाराज झालेत. ते म्हणाले -मी नुकतीच एका वृत्तपत्रात सुप्रीम कोर्ट प्रकरणाची सुनावणी करण्यास विलंब करत असल्याचे वाचले आहे. आम्हालाही एक ब्रेक द्या. तुम्ही न्यायाधीशांना किती टार्गेट कराल. त्यालाही एक मर्यादा आहे. त्याचे झाले असे की, गुरूवारी ख्रिश्चन समुदायाविरोधातील हिंसाचारावर प्रकाश टाकणारी एक याचिका खंडपीठापुढे आली. त्यावर वकिलांनी तत्काळ सुनावणी घेण्याची मागणी केली. त्यावर न्यायमूत्री चंद्रचूड यांनी उपरोक्त प्रतिक्रिया दिली. संपुर्ण बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

बातम्या आणखी आहेत...