आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • CJI NV Ramana Retirement; Live Streaming Of Supreme Court Ceremonial Bench First Time; Chief Justice Of India Ramana Last Working Day

सरन्यायाधीश रमणांची आज निवृत्ती:कोर्टातच ज्येष्ठ वकील दुष्यंत यांना अश्रू अनावर, रमणांना म्हणाले - तुम्ही लोकांचे न्यायाधीश

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा आज शुक्रवारी निवृत्त होत आहेत. यापूर्वी ते 5 महत्त्वाच्या खटल्यांची सुनावणी करणार आहेत. दरम्यान, देशाच्या इतिहासात प्रथमच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणींचे थेट लाईव्ह प्रसारण होणार आहे. सकाळी 10:30 वाजेपासून पासून सर्वोच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर हे प्रसारण पाहता येणार आहे.

आज सुनावणीदरम्यान अ‌ॅटर्नी जनरल केके वेणुगोपाल रमणा यांना उद्देशून म्हणाले की, तुमच्या निवृत्तीमुळे आम्ही एक विचारवंत आणि उत्कृष्ट न्यायाधीश गमावत आहोत. त्याचवेळी ज्येष्ठ वकील दुष्यंत दवे यांना तर कोर्टातच रडू कोसळले. सरन्यायाधीश रमणांना ते म्हणाले, तुम्ही लोकांचे न्यायाधीश आहात.

अखेरच्या 2 दिवसांत या प्रकरणांवर केली सुनावणी

 • कर्नाटक कोळसा खाण- कर्नाटकातील बेल्लारी, चित्रदुर्ग आणि तुमाकुरू जिल्ह्यांतील खाण कंपन्यांसाठी लोह खनिज उत्खनन मर्यादेत वाढ.
 • मोफत निवडणूक घोषणा- निवडणुकीतील मोफत आश्वासनांचे प्रकरण 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे वर्ग केले.
 • गोरखपूर दंगल प्रकरण- 2007 च्या हेट स्पीच प्रकरणात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर खटला चालवण्यास मंजुरी देण्यात आली आहे. या मंजुरीला आव्हान देणारी याचिका फेटाळण्यात आली.
 • दिवाळखोरी कायदा- सीमा शुल्क अधिनियमसंबंधात दिवाळखोरी कायद्याबाबत सूचना केल्या. त्यानुसार सीमाशुल्क प्राधिकरण केवळ शुल्क आणि आकारणीचे प्रमाण ठरवू शकते परंतु वसुलीची कार्यवाही सुरू करू शकत नाही.
 • पेगासस- समितीने सांगितले की, त्यांना 29 पैकी 5 फोनमध्ये मालवेअर आढळले, परंतु ते पेगासस होते, हे स्पष्टपणे सांगता येणार नाही. सरकारने त्यांना मदत केली नाही. पुढील सुनावणी सप्टेंबरच्या शेवटच्या आठवड्यात होणार आहे.
 • बिल्किस बानो- गुजरात सरकारच्या निर्णयाविरोधात सीपीआय(एम) नेत्या सुभासिनी अली, पत्रकार रेवती लाल आणि प्रोफेसर रूप रेखा वर्मा यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. न्यायालयाने गुजरात सरकारला नोटीस बजावून 11 दोषींनाही या प्रकरणात पक्षकार बनण्यास सांगितले आहे. पुढील सुनावणी दोन आठवड्यांनी होणार आहे.
 • पीएमएलए- प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग अॅक्ट (पीएमएलए) वरील पुनर्विलोकन याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस दिली आहे. हा कायदा अत्यंत महत्त्वाचा असून, आम्ही केवळ 2 बाबींवर पुनर्विचार करणार असल्याचे सांगितले. यातील एक बाब म्हणजे ईसीआयआरचा अहवाल (ईडीने नोंदवलेली एफआयआर) आरोपीला न देण्याची कायद्यात असलेली तरतूद आणि दुसरी बाब म्हणजे आरोपीलाच तो निर्दोष असल्याचे सिद्ध करण्यास सांगणे.
 • पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेत त्रुटी - पंतप्रधान मोदींच्या सुरक्षेतील त्रुटी प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने सर्वोच्च न्यायालयात सांगितले की, फिरोजपूरमधील एसएसपी हे कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात अपयशी ठरले.

सरन्यायाधीशांचे निरोपाचे भाषण

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा हे मास्टर ऑफ रोस्टर आहेत. म्हणजेच सुप्रीम कोर्टातील 16 बेंचेसना सरन्यायाधीशच प्रकरणांचे वाटप करतात. मात्र, काही दिवसांपूर्वी ही प्रकरणे ज्या रजिस्ट्री वहीत नोंद केली जातात, त्या कार्यपद्धतीबाबत सरन्यायाधीशांनी नाराजी व्यक्त केली. 17 ऑगस्टरोजी सरन्यायाधीशांनी सुनावणीसाठी लिस्टेड केलेले एक प्रकरण अचानक रजिस्ट्रीतून हटवण्यात आले होते. त्यामुळे सरन्यायाधीशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

याबाबत सरन्यायाधीश म्हणाले होते की, 26 ऑगस्ट रोजी आपल्या निरोपाच्या भाषणात या विषयावर बोलणार आहेत. तसेच, सध्या अनेक महत्त्वाचे मुद्दे आहेत ज्यावर प्रश्न उपस्थित करायचे आहेत, पण पद सोडण्यापूर्वी बोलू इच्छित नाहीत, या सर्व मुद्द्यांवर निरोपाच्या भाषणात बोलणार असल्याचे सरन्यायाधीश म्हणाले होते.

कामकाजाचे आज प्रथमच लाईव्ह प्रक्षेपण

आज दिवसभर हे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.
आज दिवसभर हे लाईव्ह प्रक्षेपण पाहता येणार आहे.

यापूर्वी 26 सप्टेंबर 2018 रोजी, सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने लैंगिक गुन्हे आणि वैवाहिक विवादांचा समावेश असलेल्या प्रकरणांशिवाय इतर प्रकरणांच्या सुनावणीसंबंधी थेट प्रसारणास परवानगी दिली होती. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. कर्नाटक, गुजरात, ओडिशा सारखी देशातील अनेक उच्च न्यायालये त्यांच्या संबंधित अधिकृत यूट्यूबवर सुनावणीचे थेट प्रक्षेपण करत आहेत. दरम्यान, आज केवळ एक दिवस सुप्रीम कोर्टाच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण केले जात आहे.

उदय ललित पुढील सरन्यायाधीश

सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीनंतर न्यायमूर्ती उदय ललित हे देशाचे 49 वे सरन्यायाधीस असतील. न्यायमूर्ती ललित 27 ऑगस्ट रोजी सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे सर्वात ज्येष्ठ न्यायमूर्ती ललित हे फक्त 74 दिवसांसाठी सरन्यायाधीश बनतील. कारण ते 8 नोव्हेंबरला निवृत्त होणार आहेत. 'तिहेरी तलाक'च्या प्रथेला बेकायदेशीर ठरवण्यासह अनेक ऐतिहासिक निकालांमध्ये न्यायमूर्ती ललित यांचा सहभाग होता.

बातम्या आणखी आहेत...