आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CJI UU Lalit Retirement Updates | UU Lalit’s Last Day As Chief Justice Of India In Supreme Court, Justice Chandrachud To Be 50th CJI

CJI लळित यांचा सुप्रीम कोर्टात अखेरचा दिवस:EWS कोट्यावर निकालाची शक्यता, जस्टिस चंद्रचूड होणार 50 वे सरन्यायाधीश

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

भारताचे सरन्यायाधीश यू.यू. लळीत यांचा कार्यकाळ 8 नोव्हेंबर रोजी संपत आहे. त्यांच्या कार्यकाळाच्या शेवटच्या दिवशी ते EWS कोटा प्रकरणाचा निकाल देतील. सरन्यायाधीश लळित हा निकाल देणाऱ्या 5 न्यायाधीशांच्या घटनापीठाचे अध्यक्ष असतील. या घटनापीठात न्यायमूर्ती चंद्रचूडदेखील त्यांच्यासोबत आहेत, जे 10 नोव्हेंबरपासून 50 वे सरन्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारणार आहेत. ते 9 नोव्हेंबर रोजी शपथ घेतील.

लळीत यांचा 74 दिवसांचा कार्यकाळ

सर्वोच्च न्यायालयाचे दुसरे ज्येष्ठ न्यायमूर्ती लळीत हे अवघ्या 74 दिवसांसाठी CJI बनले. CJI लळीत 8 नोव्हेंबर रोजी निवृत्त होत आहेत. त्यांनी जून 1983 मध्ये वकिलीला सुरुवात केली होती. डिसेंबर 1985 पर्यंत त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात प्रॅक्टिस केली, त्यानंतर जानेवारी 1986 मध्ये प्रॅक्टिस दिल्लीला स्थानांतरित केली.

एप्रिल 2004 मध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाने ज्येष्ठ वकील म्हणून नामनिर्देशित केले होते. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व 2G खटल्यांची सुनावणी करण्यासाठी सीबीआयचे विशेष सरकारी वकील म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. न्यायमूर्ती लळीत हे सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया लीगल सर्व्हिसेस कमिटीचे दोन टर्म सदस्य होते.

फौजदारी कायदा तज्ज्ञ न्यायमूर्ती लळीत हे 13 ऑगस्ट 2014 रोजी बारमधून सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश झाले. बारमधून सीजेआय बनणारे ते दुसरे न्यायाधीश होते.

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील होते 16 वे सरन्यायाधीश

न्यायमूर्ती चंद्रचूड यांचे वडील यशवंत विष्णू चंद्रचूड हे देशाचे 16 वे सरन्यायाधीश होते. त्यांचा कार्यकाळ 22 फेब्रुवारी 1978 ते 11 जुलै 1985 म्हणजेच सुमारे 7 वर्षांचा होता. वडिलांच्या निवृत्तीनंतर 37 वर्षांनी तेसुद्धा त्याच पदावर बसणार आहेत. न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी सुप्रीम कोर्टातील वडिलांचे दोन मोठे निर्णयही रद्द केले आहेत. ते त्यांच्या निर्दोष निर्णयांसाठी ओळखले जातात. न्यायमूर्ती डीवाय चंद्रचूड यांचा कार्यकाळ 9 नोव्हेंबर 2022 ते 10 नोव्हेंबर 2024 असा 2 वर्षांचा असेल.

दुसऱ्यांदा सेरेमोनियल बेंचचे लाइव्ह स्ट्रीमिंग

सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात प्रथमच न्यायमूर्ती एन. व्ही. रमणा यांच्या निवृत्तीच्या वेळी CJIच्या सेरेमोनियल बेंचचे थेट प्रसारण करण्यात आले. जे सर्वोच्च न्यायालयाच्या वेबसाइटवर वेबकास्ट करण्यात आले होते. सरन्यायाधीश लळीत यांच्या सेरेमोनिअल बेंचचेही लाइव्ह स्ट्रीमिंग होईल. यापूर्वी 26 सप्टेंबर 2018 रोजी सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या खंडपीठाने लैंगिक गुन्हे आणि वैवाहिक विवादांचा समावेश असलेल्या प्रकरणांशिवाय सुनावणीच्या थेट प्रसारणास परवानगी दिली होती.

मात्र, सर्वोच्च न्यायालयाने त्याचा व्यवहारात अवलंब केला नाही. कर्नाटक, गुजरात, ओडिशासारखी देशातील अनेक उच्च न्यायालये त्यांच्या संबंधित अधिकृत यूट्यूबवर सुनावणीचे थेट प्रक्षेपण करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...