आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापर्यावरणपुरक शॉपिंग बॅग्ज, डिशवॉशर्स, बॅटरी, कटलरी आणि बॉटल्स प्रचंड लोकप्रिय हाेत आहेत. यांचा उद्देश्य पर्यावरणाला नुकसानापासून वाचवण्याचे आहे. मात्र तसं होत नाही. एका अहवालानुसार, ग्रीन प्रॉडक्ट्स विकणाऱ्या कंपन्या खोटे दावे करत आहेत. त्यांचा व्यवसाय खासकरून आक्रामक मार्केटिंग आणि जाहिरातीच्या भरवशावर आहेत. कॉपोर्रेटच्या भाषेत याला ‘ग्रीन वॉशिंग’ म्हटले जाते. गेल्या वर्षी मिस्रमध्ये कॉप२७ जलवायु शिखर सम्मेलनात, संयुक्त राष्ट्र महासचिव अँटोनियो गुटेरेसने म्हणाले होते, ‘आपल्याला ग्रीनवाशिंग सहन करतान कामा नये.
’ फॉक्सव्हॅगन, शेल, बीपी, नेस्ले, फॅशन ब्रँड एचअँएम आणि कोका कोलासह अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांवर ग्रीनवाशिंगचे आरोप लागले आहेत. जागतिक पातळीवर ग्रीनवॉशिंगची पातळी २२ लाख कोटी डॉलर (सुमारे १८१६ लाख कोटी रुपये) पोहोचण्याचा अंदाज आहे. राष्ट्रीय कायदा विद्यापीठ, ओडिशातील व्हिजिटिंग प्रोफेसर बेजोन कुमार मिश्रा यांच्या मते, भारतातही ग्रीन वॉशिंग ही एक मोठी समस्या आहे. ते म्हणाले, “कंपन्यांनी ग्रीन उत्पादनांबाबत केलेले दावे संशयास्पद आहेत.
देशात ७ वर्षात ७३ टक्के वाढले इको-फ्रेंडली मार्केट कॅनेडियन मार्केटिंग कंपनी टेराचॉइसच्या संशोधन अहवालानुसार, ५-७ वर्षांत भारतातील पर्यावरणपूरक उत्पादनांची बाजारपेठ ७३% ने वाढली आहे. पर्यावरणाविषयी जागरूकता वाढल्याने लोक उत्पादनांच्या खरेदीसाठी आग्रही आहेत. जूनमध्ये आय बेन अँड कंपनीच्या अहवालानुसार, भारतातील २०% ग्राहक पर्यावरणाबाबत जागरूक आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.