आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Claims Of Community Infection Of Corona Virus In India, The Experts Handed Over The Report To The Prime Minister

काेराेना संकट:देशात सामुदायिक संसर्गाचा दावा, महामारीशी निगडित तज्ज्ञांनी पंतप्रधानांकडे सुपूर्द केला अहवाल

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • उपाययाेजनांसाठी साथराेग तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही
  • चाैथ्या टप्प्यात सवलतींमुळे संसर्गात वाढ
Advertisement
Advertisement

सार्वजनिक आराेग्य तज्ज्ञांनी भीतीदायक माहिती दिली आहे. देशात काेराेना व्हायरसचा सामुदायिक संसर्ग (कम्युनिटी स्प्रेड) हाेत असल्याचा त्यांनी केलेला दावा सिद्ध झाला आहे. या तज्ज्ञांत आयसीएमआर संशाेधन समूहाच्या सदस्यांचाही समावेश आहे. परंतु सरकारकडून मात्र देशात काेेराेनाचा सामुदायिक संसर्ग हाेत नसल्याचे वारंवार सांगण्यात येत आहे. इंडियन पब्लिक हेल्थ असाेसिएशन, इंडियन असाेसिएशन आॅफ प्रिव्हेंटिव्ह अँड साेशल मेडिसिन आणि इंडियन असाेसिएशन आॅफ एपिडेमियाॅलाॅजिस्टच्या तज्ज्ञांनी संयुक्तपणे तयार केलेला अहवाल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याकडे नुकताच सुपूर्द करण्यात आला आहे. या अहवालानुसार, दाट आणि मध्यम लाेकसंख्या असलेल्या भागात या संसर्गाचा सामुदायिक फैलाव झाल्याचे सिद्ध झाले आहे. या स्तरावर काेविड-१९चा नायनाट करणे अवास्तव वाटत असल्याचे या अहवालात नमूद केले आहे. 

उपाययाेजनांसाठी साथराेग  तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही

या महामारीचा सामना करण्यासाठीच्या उपाययाेजनांसदर्भात साथराेग तज्ज्ञांचा सल्ला घेतला नाही. त्यांच्या सल्ल्यानुसार चांगले उपाय करता येऊ शकले असते, असे मत तज्ञांनी व्यक्त केले. विद्यमान सार्वजनिक माहितीच्या आधारावर डाॅक्टर आणि साथराेगाच्या शैक्षणिक तज्ज्ञांनी सरकारला सल्ला दिला. धाेरणकर्ते हे पूर्णपणे प्रशासकीय नाेकरशहांच्या विश्वासावर अवलंबून हाेते. त्यामुळे या संपूर्ण प्रक्रियेत साथराेग विज्ञान, सार्वजनिक आराेग्य, प्रतिबंधात्मक निदान या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सहभाग खूपच मर्यादित हाेता.

चाैथ्या टप्प्यात सवलतींमुळे संसर्गात वाढ :

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या चाैथ्या टप्प्यात दिलेल्या सवलतींमुळे हा संसर्ग वाढल्याचे अहवालात म्हटले आहे.

Advertisement
0