आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर डेटा स्टोरी:वर्षभरात कोविडचे 15 लाख क्लेम, यात एक तृतीयांश गेल्या 1 महिन्यात; जनरल आणि हेल्थ इन्शुरन्सकडे दाव्यांचा ओघ, महाराष्ट्रात सर्वाधिक क्लेम

नवी दिल्ली4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोविडच्या दुसऱ्या लाटेत विमा कंपन्यांकडे क्लेम वाढले

देशात कोरोनाची दुसरी लाट आल्यानंतर सामान्य आणि आरोग्य विमा कंपन्यांकडे दाव्यांची संख्या वेगाने वाढत आहे. मेच्या मध्यापर्यंतच्या आकड्यांवर नजर टाकल्यास नॉन लाइफ इन्शुरन्स कंपन्यांकडे जवळपास २३ हजार कोटी रुपयांचे १४.५ लाखाहून जास्त क्लेम आले आहेत. यामध्ये साडेचार लाखांहून जास्त म्हणजे एक तृतीयांश क्लेम १० एप्रिल ते १५ मेदरम्यान येतील. विमा कंपन्यांनी ११.५ हजार कोटी रुपयांपेक्षा जवळपास १२ लाख ३२ हजार प्रकरणांचा निपटारा झाला आहे. जनरल इन्शुरन्स कौन्सिलच्या आकडेवारीनुसार, १० एप्रिलपर्यंत विमा कंपन्यांकडे १४,८२१ कोटी रुपयांची १०,१४,२८५ प्रकरणे आली होती. यापैकी ७,९५७ कोटी रुपयांच्या ८,६५,९६८ प्रकरणांचा निपटारा झाला होता. १० एप्रिलनंतर अचानक दावे वाढू लागले आणि १० एप्रिल ते १४ मेदरम्यान विमा कंपन्यांकडे ४,६६,४९८ नवीन प्रकरणे आली. यापैकी ३,६६,३०६ प्रकरणांचा निपटारा झाला आहे. संख्येच्या हिशेबाने पाहिल्यास ८३ टक्के क्लेमचा निपटारा झाला आहे. दुसरीकडे, रकमेच्या हिशेबाने ५१.३८ %प्रकरणांचा निपटारा झाला. यात ३,६२१ कोटी रु. मूल्याच्या ४,४८,९५३ प्रकरणांचा निपटारा झाला.

बातम्या आणखी आहेत...