आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • India China Clash : Indo Chinese Troops Clash In Ladakh's Galwan Bay; Two Jawans Martyred Along With An Indian Colonel

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चिनी सैनिकांचा हल्ला:भारताच्या कमांडिंग ऑफिसरसह 20 सैनिक शहीद, गालवान येथे चर्चा सुरू असतानाच चिनी सैनिकांचा हल्ला

लडाख10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सोमवारी संध्याकाळी दोन्ही देशांचे अधिकारी चर्चा करत असताना घडला हिंसाचार

भारत चीन सीमेवर चिनी सरकारने 45 वर्षांनंतर पुन्हा दगा दिला आहे. आधी सोमवारी रात्री हिंसाचारात एका अधिकाऱ्यासह इतर 2 भारतीय जवान शहीद झाले. त्यानंतर झालेल्या हिंसाचारात कमांडिंग ऑफिसर आणि इतर 20 जवान शहीद झाल्याचे समोर आले आहे. या हिंसाचारात कुठल्याही देशाकडून एक गोळी सुद्धा झाडण्यात आलेली नाही. जगातील दोन अण्वस्त्र संपन्न देशांमध्ये समुद्रसपाटीपासून 14 हजार फुट उंचीवर गालवान व्हॅलीमध्ये हा हिंसाचार झाला. याच ठिकाणी 1962 मध्ये झालेल्या युद्धात भारताचे 33 जवान शहीद झाले होते. उल्लेखनीय बाब  म्हणजे, दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये गेल्या 41 दिवसांपासून वाद सुरू होते. वाद मिटवण्यासाठी वरिष्ठ अधिकारी स्तरावर चर्चा देखील करण्यात आल्या. परंतु, 15 जून रोजी हा तणाव उफाळून आला चीनच्या सैनिकांनी अचानक हल्ला सुरू केला. वृत्तसंंस्थेने सूत्रांचा दाखला देत जारी केलेल्या माहितीनुसार, या मृतांचा आकडा वाढण्याची भीती आहे. चीनच्या बाजूने देखील काही सैनिक मारले गेले आहेत.

चीनच्या उलट्या बोंबा

या चकमकीत चीनचे जवान सुद्धा ठार झाले. रॉयटर्स वृत्तसंस्थेला चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, भारताने एकतर्फी कारवाई करू नये. अन्यथा त्यांनाच त्रास होईल. गेल्या कित्येक दिवसांपासून भारतीय हद्दीत घुसखोरी करणाऱ्या चीनने उलट भारतावरच चिनी हद्दीत प्रवेश केल्याचा आरोप केला आहे.

भारतीय लष्कर म्हणाले, परिस्थिती नियंत्रणात

भारतीय लष्कराकडून यासंदर्भात अधिकृत दुजोरा देण्यात आला आहे. लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे, ‘‘सोमवारी रात्री गालवान परिसरात डी-एस्कलेशन प्रक्रिया सुरू होती. परंतु, याचवेळी अचानक हिंसाचार झाला. यामध्ये भारताच्या एका अधिकाऱ्यासोबतच दोन जवान शहीद झाले आहेत. सध्या दोन्ही देशांचे वरिष्ठ अधिकारी यावर चर्चा करत आहेत." थोड्याच वेळात आणखी एकदा भारतीय लष्कराने संवाद साधला. त्यामध्ये चीन सीमेवरील परिस्थिती आता नियंत्रणात आहे. सोबतच, या हिंसेत दोन्ही देशांचे जवान शहीद झाले असेही सांगण्यात आले आहे.

1967 मध्ये झाला होता असाच वाद

11 सप्टेंबर 1967 रोजी सिक्किम येथली नाथू-ला परिसरात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसाचार झाला होता. यानंतर 16 सप्टेंबर 1967 मध्ये सुद्धा अशाच प्रकारची चकमक उडाली होती. ऑक्टोबर 1967 पर्यंत हा वाद सुरूच होता. चीनने त्यावेळी केलेल्या हिंसेत आपले 32 सैनिक मारले गेल्याचा दावा केला होता. तर भारताचे 67 जवान शहीद झाले होते. चो-ला परिसरात झालेल्या चकमकीत आणखी 36 भारतीय जवान शहीद झाले होते.

बातम्या आणखी आहेत...