आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
बिहारमध्ये सरकार तर स्थापन केले जात आहे, परंतु सत्तारूढ होत असलेल्या पक्षातच अंतर्गत मतभेद दिसत आहेत. यात भाजप सर्वात अस्वस्थ स्थितीत आहे. उपमुख्यमंत्री पदावरून सुरू असलेला वाद थांबताना दिसत नाहीये.
तीन प्रश्नांवर वाद
1. जर मागासवर्गातून उपमुख्यमंत्री पद द्यायचे होते तर तारकिशोरपेक्षा ज्येष्ठ नंदकिशोर यादव यांच्या नावाचा विचार का केला जात नाही?
2. अत्यंत मागासवर्गीयांच्या नावावर रेणू देवी यांना उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार होते, तर आधीपासूनच या शर्यतीत असणार्या डॉ प्रेम कुमार यांचे नाव का नाही?
3. मुख्यमंत्री नितीशकुमार मागासवर्गीय आहेत, तर मग मंगल पांडेय यांच्यासारख्या मागासवर्गीयातून येणाऱ्या नेत्याला भाजप उपमुख्यमंत्रिपद का देत नाही?
इतर राज्यांप्रमाणेच बिहारमध्ये देखील भाजपच्या या प्रयोगाला पक्षातील नेते थेट नाकारत नाहीत मात्र अंतर्गत मतभेद सुरू आहेत. यामुळे मंत्र्यांची नावे राजभवनात पोहोचवालयला भाजपला वेळ लागला.
प्रदेशाध्यक्ष आणि बिहार प्रभारी नाराज
भाजपमधील ज्येष्ठ-कनिष्ठांशी जातिय समीकरणाची लढाई रविवारी संध्याकाळी सुरू झाली आणि रविवारी सकाळपर्यंत ती कामय होती. भाजपमध्ये बड्या नेत्यांमधील सध्या सुरू असलेल्या मतभेदावरून प्रदेशाध्यक्ष डॉ.संजय जयस्वाल आणि बिहारचे प्रभारी भूपेंद्र यादव नाराज दिसत आहेत. जदयूकडून संभाव्य मंत्र्यांना शपथविधीसाठी फोन करण्यासाची औपचारिकता सुरू होती मात्र भाजपत हे काम लटकून राहिले.
शपथविधीच्या चार तासांपूर्वी डॉ. संजय जयस्वाल एक यादी घेऊन राजभवनात दाखल झाले. या यादीमध्ये भाजपच्या अनेक ज्येष्ठ मंत्र्यांची नावे आहेत. परंतू त्यांची नावे दहावी पास उपमुख्यमंत्र्याच्या नावानंतर असल्यामुळे ते नाराज आहेत. रविवारी एनडीएच्या बैठकीदरम्यान भास्कर यांनी तारकिशोर प्रसाद यांचे नाव सर्वप्रथम समोर आणले होते. रविवारी संध्याकाळपासून रेणू देवीचे नाव चर्चेत आले आहे. दरम्यान भाजपने या दोघांपैकी एकाच्याही नावाची पुष्टी केली नाही. अशा परिस्थितीत ज्येष्ठ मंत्र्यांचे मतभेद पाहता भाजप उपमुख्यमंत्रीपदावर बॅकफूटवर येण्याचीही शक्यता आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.