आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Clashes Between Two Groups In Jodhpur, Stone Pelting In Anantnag On Security Forces After Namaz, Curfew Again In Khargone MP

ईदला अनेक ठिकाणी संघर्ष:जोधपुरात 2 गट भिडले, घरांवर अ‍ॅसिडच्या बॉटल्स फेकल्या; अनंतनागमध्ये सुरक्षा दलांवर दगडफेक; खरगोनमध्ये संचारबंदी

नवी दिल्ली22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

राजस्थानच्या जोधपूरमध्ये ईदच्या पवित्र दिवशी मोठा हिंसाचार उसळला आहे. यामुळे प्रशासनाने शहरातील 10 भागांत संचारबंदी लागू केली आहे. काही समाजकंटकांनी सूरसागर भागातील आमदाराच्या घराबाहेर जाळपोळ केली. त्यामुळे केंद्रीय गृह मंत्रालयाने या घटनेचा अहवाल मागवला आहे.

जोधपूरमध्ये 2 गटांत हिंसक झडप झाली आहे. या घटनेला 12 तास लोटले तरी पोलिसांना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यात अपयश आले आहे. समाजकंटकांनी संपूर्ण शहरात जाळपोळ केली. पूर्वनियोजित कटानुसार आलेल्या उपद्रवींनी मोठा गदारोळ केला. त्यांनी अॅसिडच्या बाटल्या घरांवर फेकल्या. दहशत पसरवण्यासाठी तलवारीही फिरवल्या. कबुतर चौकात दीपक परिहार नामक एका तरुणाच्या पाठीत सूरा खूपसण्यात आला. त्यात तरुण गंभीर जखमी झाला.

मंगळवारी सकाळी जोधपूरच्या जालोरी गेट भागात जमा झालेला जमाव

​​​​​​​जोधपूरच्या अनेक भागांत तलवारबाजी, दगडफेक व जाळपोळीच्या घटना घडल्या. त्यात एक पोलिस कर्मचारी जखमी झाला. तत्पूर्वी, सोमवारी रात्री 4 पोलिस जखमी झाले होते. या प्रकरणी 3 जणांना अटक करण्यात आली आहे. हिंसाचाराविरोधात नागरिकांनी हनुमान चालिसाचे पठणही सुरू केले आहे. पोलिसांनी उदय मंदिर, नागोरी गेट, सदर कोतवाली, सदर बाजार, सूरसागर, सरदारपुरा, खांडाफलसा, प्रतापनगर, देवनगर, प्रतापनगर सदर आदी भागांत संचारबंदी लागू केली आहे.

तत्पूर्वी, सोमवारी रात्री झेंडे व लाउडस्पीकर लावण्याच्या मुद्यावरुन 2 समुदायांत दगडफेक झाली होती. मंगळवारी सकाळी एका समुदायाच्या नागरिकांनी जालोरी गेट भागात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांच्यावर लाठीमार केला.

CM गहलोत यांनी बोलावली उच्चस्तरीय बैठक

समाजकंटकांनी मंगळवारी 20 हून वाहनांची मोडतोड केली. अनेक एटीएमचीही तोडफोड केली. रात्री उशिरा जालोरी गेट व ईदगाह भागात तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला. तसेच इंटरनेट सेवाही बंद करण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी दोन्ही समुदायांना शांतता राखण्याचे आवाहन केले. त्यांनी या प्रकरणी एक उच्चस्तरीय बैठकही घेतली आहे. संपूर्ण बातमी इथे वाचा...

ईदच्या नमाजानंतर आंदोलकांनी लष्करावर दगडफेक केली

छायाचित्रात एक व्यक्ती सुरक्षा दलाच्या वाहनावर दगडफेक करताना दिसत आहे.
छायाचित्रात एक व्यक्ती सुरक्षा दलाच्या वाहनावर दगडफेक करताना दिसत आहे.

जम्मू-काश्मीरमधील अनंतनाग जिल्ह्यात आज सकाळी दगडफेकीची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येथे ईदच्या नमाजनंतर एका मशिदीबाहेर दगडफेक झाली. आंदोलकांनी सुरक्षा दलांवर दगडफेक केली. सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे पोलिसांनी सांगितले.

खरगोन हिंसाचाराला 22 दिवस उलटूनही तणाव

आज खरगोन दंगलीला 22 दिवस उलटल्यानंतर कर्फ्यूमध्ये सण साजरे केले जात आहेत. सोमवारी सायंकाळी उशिरा पोलीस आणि प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आज कर्फ्यू शिथिल केला जाणार नाही, असा निर्णय घेतला. ईदची नमाज घरीच होणार आहे. अक्षय्य तृतीयेला शहरात कुठेही सार्वजनिक विवाह होणार नाही. तसेच परशुराम जयंतीची मिरवणूकही निघणार नाही.

दंगलीचे चटके सोसलेल्या पोलिसांसाठी आज पुन्हा परीक्षेचा दिवस आहे. आज शांतता राहिल्यास प्रशासन वेगाने कर्फ्यू उघडण्याचा विचार करेल, असे मानले जात आहे. मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. तालाब चौक, पहाडसिंगपुरा, काजीपुरा, मोहन टॉकीज, गुरुव मोहल्ला, भावसार मोहल्ला आदी ठिकाणी जास्तीत जास्त बंदोबस्त आहे.

प्रभारी एसपी रोहित काशवानी यांनी सांगितले की, पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. संपूर्ण शहरात 1300 जवान तैनात करण्यात आले आहेत. ड्रोनद्वारे सतत नजर ठेवली जात आहे. रुग्णवाहिका आणि अग्निशमन दलासह सर्व आपत्कालीन सेवादेखील सतर्क आहेत. दुसरीकडे, पोलिस मुख्यालयाने निमार, माळवा आणि महाकौशल या संवेदनशील जिल्ह्यांना अलर्ट पाठवला आहे.

बातम्या आणखी आहेत...