आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराजस्थानात 16 मार्चपासून 10 वी बोर्डाची परीक्षा सुरू होणार आहे. या परीक्षेच्या तोंडावरच एका 10 वीच्या विद्यार्थिनीने अभ्यासाच्या दबावामुळे आत्महत्या केली आहे. विद्यार्थिनीने आपल्या घरातच गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
दौसा जिल्ह्यातील लालसोटच्या न्यू कॉलनीत गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास ही घटना घडली. विद्यार्थिनीकडे सुसाइड नोटही आढळली. त्यात तिने लिहिले होते - मी 95 टक्क्यांहून अधिक मार्क्स घेऊ शकणार नाही. मी अभ्यासामुळे परेशान झाले आहे.
यासंबंधीच्या वृत्तानुसार, 16 दिवसांनंतर मृत खुशबूची (15) 10 वी बोर्डाची परीक्षा होती. त्यामुळे ती घरी राहून अभ्यास करत होती. घटनेच्या दिवशी तिचा छोटा भाऊ घरात होता. तो चौथ्या वर्गात शिकतो.
खुशबू मीणाची आई गुरुवारी सकाळी 11 च्या सुमारास छोट्या भावाची शालेय शुल्क जमा करण्यासाठी गेली होती. घरी कुणी नसल्याचे पाहून खुशबूने हे पाऊल उचलले. आई घरी परतल्यानंतर खुशबूने गळफास घेतल्याचे स्पष्ट झाले.
16 मार्चपासून सुरू होणार परीक्षा
खुशबूची येत्या 16 तारखेपासून परीक्षा सुरू होणार होती. शिक्षकांच्या मते, ती एक हुशार विद्यार्थिनी होती. त्यामुळे ती अभ्यासाच्या तणावात असल्याचे केव्हाच जाणवले नाही.
खुशबूच्या आत्महत्येची माहिती मिळताच तिचे नातलग लालसोटला पोहोचले. खुशबू मीणाचे वडील बसराम मीणा जारोल जिल्ह्यातील एका सरकारी शाळेत शिक्षक आहेत. मुलीच्या आत्महत्येची बातमी मिळताच त्यांनी घर गाठले. खुशबूने अभ्यासाच्या दबावामुळे आत्महत्या केल्याचे आपल्या पत्रात म्हटले आहे.
खुशबूची सुसाइड नोट जशीच्या तशी...
आय अॅम सॉरी मम्मी - पप्पा.
माझ्याने होणार नाही. कदाचित मला 95 टक्के मिळणार नाहीत. मी या 10 वीच्या अभ्यासामुळे परेशान झाले आहे. मला आता अजून सहन होत नाही.
आय लव्ह यू, पप्पा, मम्मी आणि ऋषभ. आय अॅम सॉरी.
खुशबू.
खुशबूने आपल्या सुसाइड नोटच्या शेवटी एक हसरी स्माइलीही काढली आहे.
आम्ही केव्हाच अभ्यासासाठी दबाव टाकला नाही
मुलीच्या आत्महत्येमुळे संपूर्ण कुटुंबाला धक्का बसला आहे. इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी असे टोकाचे पाऊल उचलेल असे त्यांना स्वप्नातही वाटले नव्हते. आई-वडिलांचे रडून वाईट हाल झालेत. खुशबूचा 4 वर्षांचा भाऊही वारंवार आपल्या मोठ्या बहिणीविषयी विचारत आहे.
खुशबूची आई म्हणते - आम्ही केव्हाच मुलीवर अभ्यासासाठी दबाव टाकला नाही. आयुष्यात टक्केवारीला काहीच महत्त्व नसते असे आम्ही तिला सांगत होतो. पण ती नेहमीच अव्वल राहण्याची गोष्ट करत होती. तिने हे पाऊल का उचलले, हे समजत नाही.
खुशबूच्या शाळेचे मुख्याध्यापक विश्राम गुर्जर म्हणाले की, खुशबू अभ्यास हुशार नव्हती असे नाही. ती हुशार होती. पण तिला आपल्याला 95 टक्के गुण मिळणार की नाही याचा आत्मविश्वास नव्हता. 16 फेब्रुवारी रोजी शाळेतील सर्वच मुलांना अभ्यासासाठी रिलिव्ह करण्यात आले. आज ही वाईट गोष्ट ऐकूण फार वाईट वाटले. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.