आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संगीतातील तारा निखळला:पद्मविभूषण पंडित जसराज यांचे निधन, 90 व्या वर्षी अमेरिकेत घेतला अखेरचा श्वास

न्यूजर्सीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

प्रसिद्ध शास्त्रीय गायक पंडित जसराज यांचे निधन झाले आहे. सोमवारी कार्डिएक अरेस्टमुळे अमेरिकेत त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 90 वर्षीय जसराज मागील काही दिवसांपासून आपल्या कुटुंबासह अमेरिकेत राहत होते.

जसराज यांचा परिचय

28 जानेवारी 1930 ला हरियाणातील हिसारमध्ये जन्मलेले पंडित जसराज यांचे कुटुंब चार पिढ्यांपासून संगीत क्षेत्रात कार्यरत होते. खयाल शैलीतील गायणात पंडित जसराज यांची पकड होती. त्यांचे वडील पंडित मोतीराम मेवाती घराण्यातील संगीत तज्ञ होते. पंडित जसराज तीन-चार वर्षांचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. जसराज सुरुवातील तबला वाजवत होते, पण नंतर गायनाकडे वळले. त्यांनी साडे तीन सप्तकापर्यंत शुद्ध उच्चारण आणि स्पष्टता ठेवण्याच्या मेवाती घराण्याच्या परंपरेला पुढे नेले. सरकारने 2000 साली संगीत क्षेत्रातील अतुलनीय कामगिरीबद्दल त्यांना पद्मविभूषण पुरस्काराने गौरवले होते.

जसरंगी जुगलबंदीची रचना केली

पंडित जसराज यांनी एका अनोख्या जुगलबंदीची रचना केली होती. यात महिला आणि पुरुष गायक वेगवेगळ्या रागांमध्ये एकसोबत गातात. या जुगलबंदीला 'जसरंगी' नाव दिले.

मधुराष्टकम् त्यांना प्रिय होते

मधुराष्टकम् श्री वल्लभाचार्य जी द्वारे रचित भगवान कृष्णाची मधुर स्तुती आहे. पंडित जसराज यांनी या स्तुतीला आपल्या आवाजाने घरा-घरापर्यंत नेले. पंडित जी आपल्या प्रत्येक कार्यक्रमात मधुराष्टकम् गायचे. या स्तुतीचे शब्द आहेत -'अधरं मधुरं वदनं मधुरं, नयनं मधुरं हसितं मधुरं। हृदयं मधुरं गमनं मधुरं, मधुराधिपतेरखिलं मधुरं॥'

जसराज यांच्या सन्मानार्थ ग्रहाचे नाव ठेवले होते

सप्टेंबर 2019 मध्ये पंडित जसराज यांना अमेरिकेने एका अनोखा सन्मान दिला आणि 13 वर्षांपूर्वी शोधलेला ग्रहला त्यांचे नाव देण्यात आले होते. या ग्रहाचा शोध नासा आणि इंटरनॅशनल एस्ट्रोनॉमिकल यूनियनच्या शास्त्रज्ञांनी लावला होता. या ग्रहाचा नंबर जसराज यांच्या जन्म तारखेच्या उलट ठेवले. जसराज यांची जन्मतारीख 28/01/1930 आहे आणि ग्रहाचा नंबर 300128 होता.

अंटार्कटिकात गाण्याचा रेकॉर्ड

पंडित जसराज यांनी 2012 मध्ये एक अनोखी कामगिरी केली. 82 व्या वर्षी त्यांनी अंटार्कटिकाच्या दक्षिण ध्रुवावर आपले गायण सादर केले होते. यासोबतच सातही खंडात गायण सादर करणारे पहिले भारतीय बनले होते.

बातम्या आणखी आहेत...