आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:सुप्रीम कोर्टाने केले साक्षींचे वर्गीकरण; तीन प्रकार

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सर्वोच्च न्यायालयाने फौजदारी प्रकरणातील साक्षीदाराचे वर्गीकरण केले आहे. कोर्ट म्हणाले, अशा खटल्यात तीन प्रकारच्या साक्षी असतात. त्याची निश्चित सुनावणी होत असलेल्या कोर्टातील न्यायाधीशांनी विवेकाच्या आधारे करावी. मध्य प्रदेशातील विदिशातील हत्येच्या प्रकरणात चार जणांच्या जन्मठेपेच्या शिक्षेला रद्द करतेवेळी न्यायालयाने हे स्पष्ट केले.

न्यायमूर्ती बी.आर. गवई व न्यायमूर्ती हिमा कोहली यांचे पीठ म्हणाले, फौजदारी प्रकरणात तीन प्रकारच्या साक्षी असतात. पहिल्या श्रेणीत पूर्णपणे विश्वसनीय साक्ष असते. दुसऱ्या श्रेणीत पूर्णपणे अविश्वसनीय तर तिसऱ्या श्रेणीतील साक्ष पूर्ण विश्वासयोग्य किंवा अविश्वसनीय नसते.

बातम्या आणखी आहेत...