आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Jammu Kashmir Pandit Murder Killing | Clear The Way For Hindus To Migrate Out Of The Valley; Hindu Employees Strike Due To Target Killing

आंदोलन:हिंदूंचा खोऱ्याबाहेर बदलीचा मार्ग मोकळा; टार्गेट किलिंगमुळे हिंदू कर्मचाऱ्यांचे धरणे, 12 मे पासून सलग आंदोलन

सुजित ठाकूर/ हारुण रशीद |नवी दिल्ली/ श्रीनगर12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

१२ मेपासून सलग आंदोलन होत असलेल्या काश्मीरमध्ये नियुक्त हिंदू कर्मचाऱ्यांसाठी खोऱ्यातून बदली होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने पीडब्ल्यूडीच्या ५ कनिष्ठ अभियंत्यांची काश्मीरमधून जम्मू विभागात बदली करण्याचा आदेश जारी केला आहे. पाचही काश्मिरी पंडित आहेत. मात्र, याआधी सरकारने स्पष्ट केले होते की, कोणत्याही हिंदू कर्मचाऱ्याची हिंसाचाराच्या भीतीमुळे काश्मीरमधून बदली केली जाणार नाही. आता अचानक केलेल्या बदल्यांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने निवेदन केले नाही ना जम्मू-काश्मीर प्रशासन काही सांगत आहे. तरीही आंदोलन करणाऱ्या ५ हजार पंडित कर्मचाऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. मात्र, सर्व पंडित कर्मचाऱ्यांना खोऱ्यातून बाहेर सुरक्षित ठिकाणी बदली दिली जात नाही तोवर आंदोलन संपणार नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या ऑल मायग्रेंट (निर्वासित) कर्मचारी संघ काश्मीरने सांगितले की, विविध सरकारी प्रयत्नानंतरही हिंदू कर्मचारी खोऱ्यात सुरक्षित नाहीत. त्यामुळे खोऱ्यातून बाहेर देशात कुठेही बदली होईपर्यंत आंदोलन जारी राहील.

हिंदू बिगर पंडितांच्या बदलीसाठी समिती

सरकारने काश्मीरमध्ये नियुक्त मूळ जम्मूतील हिंदू कर्मचाऱ्यांच्या (बिगर पंडित) बदल्यांवर निर्णय घेण्याआधी समितीची स्थापना केली आहे. मुख्य सचिव (कार्मिक विभाग) मनोजकुमार द्विवेदी समितीचे प्रमुख आहेत. समितीला बदलीशी संबंधित सर्व पैलूंची पडताळणी करेल. ही समिती पंडितांच्या बदलीसाठी शिफारस करणार नाही. पंडित कर्मचाऱ्यांच्या बदलीशी संबंधित कोणताही निर्णय केंद्रीय गृह मंत्रालयाच्या मंजुरीशिवाय होऊ शकत नाही.

बातम्या आणखी आहेत...