आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Climate Change Updates: Corona Increase Demand For Weather Forecasters; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:हवामान बदल आणि कोरोनामुळे हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्यांची मागणी वाढली, हेज फंडच्या धर्तीवर आता पाणी फंड मॅनेजर असतील

नवी दिल्ली16 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हवामान व कोरोना यांच्यात संबंध असल्याचे सिद्ध झाल्यास लसही वायदे बाजारात विकेल
  • सोने आणि शेअरप्रमाणे वायदे बाजारात पाण्याची खरेदी सुरू

जगभर हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्यांची मागणी वेगाने वाढत आहे. त्याचे कारण हवामान बदलामुळे हेज फंडांसारख्या वित्तीय संस्थाही पाण्याच्या स्रोतांत गुंतवणूक करत आहेत. आता तर अमेरिकेच्या नॅसडॅकमध्ये पाण्याचा इंडेक्सही बनवण्यात आला आहे. ७ डिसेंबरपासून पाण्याचा वायदे बाजारही सुरू झाला आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कॅलिफोर्नियात दीड लाखापेक्षा जास्त लोक कोरोना संक्रमित झाले होते, तर २८०० लोकांचा मृत्यू झाला होता. अमेरिकेचे सरकार समाधानी होते, कारण हा आकडा ऑगस्टच्या तुलनेत ४०% कमी होता. त्याच वेळी तेथे सलग ८ व्या वर्षी मोठा दुष्काळ पडला. प्रचंड उष्णता आणि जंगलाच्या आगीने धगधगत असलेल्या या राज्यात पाणीही वायदे बाजारात विकले जाईल, अशी घोषणा झाली.

नचिकेता आचार्य सांख्यिकी हवामान वैज्ञानिक आहेत. त्यांनी आयआयटी दिल्ली, आयआयटी भुवनेश्वर, पृथ्वी विज्ञान मंत्रालय, सिटी युनिव्हर्सिटी ऑफ न्यूयॉर्क आणि कोलंबिया युनिव्हर्सिटीत हवामान आणि पाणी उपलब्धतेवर बरेच काम केले आहे. सध्या ते पेनसिल्व्हेनिया विद्यापीठाच्या हवामान विभागात रिसर्च प्रोफेसर आहेत. त्यांनी सांगितले की, गेल्या काही महिन्यांत त्यांना आणि त्यांच्यासारख्या तज्ज्ञांना सरकार आणि विद्यापीठांव्यतिरिक्त पाण्याच्या व्यापाराशी संबंधित अनेक कंपन्यांनी नोकरीचा प्रस्ताव दिला आहे. हवामान बदल आणि कोविडमुळे हवामान वैज्ञानिकांची मागणी वाढली आहे. पाण्याची वायदा बाजारात खरेदी-विक्री झाली आणि हेज फंड्स त्यात रस घेत असतील तर ही मागणी आणखी वाढेल. हेज फंड मॅनेजरप्रमाणे पाणी फंड मॅनेजरही असतील. ते पाऊस, बर्फवृष्टी आणि दुष्काळाचा अंदाज वर्तवतील. त्याच्या आधारेच वायदे बाजारात पाण्याची किंमत ठरेल आणि शेती तसेच औद्योगिक वस्तूंच्या किमतीत वाढ-घट होईल. मग भविष्यात पाण्याच्या सिलिंडरचीही टंचाई जाणवेल का?

आज वसुंधरा दिन : कोविड व हवामानामुळे वैज्ञानिकही संभ्रमात
कोरोनामुळे भारतातील उष्ण केरळपासून युरोपच्या थंड देशांतही हाहाकार उडाला. या तथ्यामुळे वैज्ञानिकही संभ्रमित झाले. काही संशोधनांत कोरोनाचा हवामानाशी संबंध असल्याचे तर काहीत नसल्याचे सांगितले गेले. प्रा. नचिकेता म्हणाले की, फक्त एक वर्षात निष्कर्षापर्यंत पोहोचण्यासाठी हा डेटा पुरेसा नाही. काही वर्षांनी हा संबंध सिद्ध झाला तर लस शोधणाऱ्यांच्या धर्तीवर हवामानाची भविष्यवाणी करणाऱ्यांचीही मागणी वाढेल. कदाचित पाण्यासोबत लसीचीही वायदे बाजारात खरेदी-विक्री होईल.

बातम्या आणखी आहेत...