आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहान शास्त्रज्ञ जगदीशचंद्र बोस यांच्या तिजाेरीचे रहस्य कधी उलगडणार, हा प्रश्न दीर्घकाळापासून अनुत्तरित आहे. आधी बिहार, मग झारखंडमध्ये अनेक सत्तापालट झाले. कुणीही लक्ष दिले नाही. ८६ वर्षांपासून दडलेले रहस्य सरकारने आता तरी उलगडावे, अशी मागणी झारखंडमधून होत आहे. वनस्पतींमध्ये जीवनाचा शोध घेणारे सर जगदीशचंद्र बोस यांनी गिरिडीहमध्ये आयुष्याचे अंतिम क्षण घालवले होते. २३ नोव्हेंबर १९३७ रोजी त्यांनी येथे अखेरचा श्वास घेतला होता. ज्या घरात ते राहायचे ते आता जिल्हा विज्ञान केंद्र बनले आहे. या इमारतीच्या एका खोलीत असलेली तिजोरी बंद आहे. ती उघडल्यास विज्ञानाची अनेक रहस्ये उलगडू शकतात.
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, तिजोरीची रचना अशी आहे की, ती शास्त्रज्ञच उघडू शकतात. माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांना आमंत्रित करून तिजोरी उघडण्याची योजना होती. मात्र, कलाम येऊ शकले नाही. २७ जुलै २०१५ रोजी डॉ. कलाम यांचे निधन झाले. आता गिरिडीहचे आमदार सुदीव्य कुमार, सर जेसी बोस मेमोरियल सोसायटीसह विद्वान व स्थानिक लोकांनी तिजोरी उघडण्याची आणि बोस यांनी शोध लावलेल्या यंत्रांचे जतन करण्याची मागणी केली आहे. गिरिडीह विज्ञान भवनात क्रेस्कोग्राफ व सूक्ष्म लहरी डिटेक्टरचे मॉडेल ठेवलेले आहेत. दोन्ही यंत्रांचा शोध सर जेसी बोस यांनी लावला होता. या यंत्रांद्वारे वनस्पतींमध्येही जीवन असते, हे कळत होते. आश्चर्य म्हणजे ज्या घरात ते राहत होते त्याची माहिती फार कमी लोकांना होती.
सरकारशिवाय उघडणार नाही तिजोरी विद्वानांच्या मते, विज्ञान केंद्रात ठेवलेली जेसी बोस यांची रहस्यमय तिजोरी उघडण्याचा प्रयत्न झालेला नाही. सरकारच्या पुढाकाराशिवाय ती उघडता येणार नाही. त्यामुळे झारखंड व केंद्र सरकारने यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. तिजोरीत संशोधनाशी संबंधित पुरावे असण्याची शक्यता आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.