आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • CM Kejriwal Gujrat Dinner With Auto Driver Updates । Said Police Are Providing Forced Security । AAP Kejriwal Video Updates

गुजरात पोलिसांनी केजरीवालांना ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले:CM म्हणाले- ही बळजबरीची सुरक्षा; ऑटो चालकाच्या घरी जेवण

अहमदाबाद22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सोमवारी अहमदाबादमध्ये गुजरात पोलिसांनी ऑटोमध्ये बसण्यापासून रोखले. पोलिसांनी सुरक्षेचा हवाला दिला. यादरम्यान काही काळ जोरदार वादावादी झाली. संतप्त केजरीवाल म्हणाले की, तुम्ही मला जबरदस्तीने सुरक्षा देत आहात. मला हे संरक्षण नको आहे.

वास्तविक, दिल्लीचे मुख्यमंत्री त्यांच्या हॉटेलमधून एका ऑटोचालकाच्या ऑटोने त्याच्या घरी जेवणासाठी जात होते. यादरम्यान पोलिसांनी त्यांना रोखले.

केजरीवाल म्हणाले... त्यामुळेच जनता दु:खी आहे

या घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे. त्यात केजरीवाल म्हणत आहेत, 'म्हणूनच गुजरात राज्यातील जनता नाराज आहे, कारण नेते जनतेत जात नाहीत आणि आम्ही लोकांमध्ये जात आहोत, पण तुम्ही आम्हाला थांबवत आहात. तुमच्या प्रोटोकॉलने जनतेला नाखुश ठेवले आहे. केजरीवाल आपल्याला पोलिस संरक्षणाची गरज नसल्याचे वारंवार सांगत आहेत. मात्र, यानंतर केजरीवाल यांना सोडून देण्यात आले.

ऑटोवाल्यासोबत बसून केजरीवाल जेवताना.
ऑटोवाल्यासोबत बसून केजरीवाल जेवताना.

काय आहे प्रकरण?

केजरीवाल यांनी सोमवारी अहमदाबादमध्ये रिक्षाचालकांच्या मेळाव्याला संबोधित केले. यादरम्यान एका ड्रायव्हरने त्यांना त्यांच्या घरी जेवण करण्याची विनंती केली, जी केजरीवाल यांनी लगेच स्वीकारली. त्यांच्या संभाषणाचा व्हिडिओही पक्षाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर शेअर करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये ऑटोचालक केजरीवाल यांना जेवणासाठी आमंत्रित करताना दिसत आहे. तो म्हणाला- सर माझे नाव विक्रम दत्तानी आहे आणि मी तुमचा मोठा चाहता आहे. मी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पाहिला, ज्यामध्ये तुम्ही पंजाबमधील एका ऑटो चालकाच्या घरी जेवत आहात. त्याने विचारले की मी गुजराती आहे, तुम्ही माझ्या घरी पण जेवायला याल का?'

केजरीवाल म्हणाले की, नक्की येणार. पंजाबमधील एका ऑटो चालकाच्या घरी गेलो होतो. पंजाबचा ऑटोवाला आवडतो. गुजरातमधील ऑटोवालेही आवडतात. त्यांनी हसून चालकाला विचारले की- किती वाजता येऊ? आणि एका अटीवर येईन की, आज रात्री तुम्ही मला तुमच्या ऑटोने घ्यायला माझ्या हॉटेलवर यायचं. माझ्यासोबत पक्षाचे दोन सहकारी गोपाल आणि इसुदानही डिनरसाठी असतील. यानंतर रात्रीच्या जेवणाची वेळ 8 वाजता निश्चित करण्यात आली.

केजरीवाल यांनी ऐकून घेतल्या रिक्षाचालकांच्या समस्या

केजरीवाल यांनी रिक्षाचालकांच्या समस्याही ऐकून घेतल्या. तसेच त्यांनी दिल्लीत आपल्या पक्षाला जशी मदत केली तशीच गुजरातमध्येही 'आप'ला विजय मिळवून देण्यासाठी मदत करण्याची विनंती केली. केजरीवाल दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत.

गुजरातेत 'आप'कडून निवडणुकीची तयारी सुरू

गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. 'आप' राज्यात आपली पकड मजबूत करण्याच्या तयारीत आहे. गेल्या काही महिन्यांत त्यांनी अनेकदा गुजरातला भेट दिली आहे. यादरम्यान केजरीवाल यांनी महिला आणि बेरोजगार तरुणांसाठी भत्ते, दर्जेदार आरोग्य सेवा आणि शिक्षण आणि 300 युनिटपर्यंत मोफत वीज अशा अनेक घोषणा केल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...