आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओडिशा मंत्रिमंडळाचा राजीनामा:CM पटनायकांनी घेतले सर्वच मंत्र्यांचे राजीनामे, उद्या नव्या मंत्रिमंडळाचा शपथविधी

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी शनिवारी आपल्या सर्वच मंत्र्यांचे राजीनामे घेतले. त्यांच्या नेतृत्वातील नवे मंत्रिमंडळ रविवारी सकाळी 11.45 च्या सुमार शपथ घेईल. विशेष म्हणजे सत्ताधारी बीजू जनता दलाच्या (बीजेडी) सरकारला गत 29 मे रोजीच 3 वर्ष पूर्ण झालेत. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात या फेरबदलाची चर्चा सुरू होती. काही वादग्रस्त घटनाक्रमांमुळे विरोधकही सरकारच्या प्रतिष्ठेवर सवाल उपस्थित करत होते.

सर्वप्रथम ओडिसा विधानसभेचे सभापती सूर्यनारायण पात्रो यांनी राजीनामा दिला. त्यानंतर सर्वच मंत्र्यांनी उपसभापतींकडे आपापले राजीनामे सोपवले.

हे होऊ शकतात मंत्री

सूत्रांच्या माहितीनुसार, उद्योग व ऊर्जा मंत्री कॅप्टन दिव्या शंकर मिश्रा यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होऊ शकते. तर माहिती व जनसंपर्क मंत्री रघुनंदन दास, वाणिज्य व परिवहन मंत्री पद्मनाभ बेहरा, पोलाद व उत्खनन मंत्री प्रफुल्ल कुमार मलिक, कौश्यल्य विकास व तंत्रज्ञान शिक्षण मंत्री प्रेमानंद नायक यांचे खाते बदलू शकते. चिकिटीच्या आमदार उषा देवी यांची ओडिशा विधानसभेच्या सभापतीपदी वर्णी लागण्याची शक्यता आहे. त्या विधानसभेच्या पहिल्या महिला सभापती ठरतील.

2 महिन्यांपूर्वी आंध्र मंत्रिमंडळाने दिला होता राजीनामा

2 महिन्यांपूर्वीच आंध्र प्रदेशच्या कॅबिनेटने राजीनामा दिला होता. राज्याच्या सर्वच 24 मंत्र्यांनी मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी यांच्याकडे आपला राजीनामा सोपवला होता. 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीत दैदिप्यमान विजय मिळाल्यानंतर 5 वर्षांच्या कार्यकाळाच्या मध्यात आपली संपूर्ण टीम बदलण्याचे संकेत दिले होते. त्यानुसार त्यांनी हा बदल केला होता. हे फेरबदल गतवर्षी डिसेंबर महिन्यातच होणार होते. पण, कोरोनामुळे ते लांबणीरवर पडले. आता आंध्र प्रदेशात नवे मंत्रिमंडळ कार्यरत आहेत.

बातम्या आणखी आहेत...