आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पूरस्थितीत CM योगींचे रेडकार्पेट वेलकम:TRS नेत्याची टीका - हीच आहे डबल इंजिनची विचारसरणी; NSUI म्हणाली -ही पीडितांची थट्टा

वाराणसीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

सीएम योगी आदित्यनाथ बुधवारी पूरग्रस्त वाराणसीच्या दौऱ्यावर पोहोचले. त्यांनी बोटीतून पूरग्रस्त भागाचा दौरा केला. बोटीतून उतरल्यानंतर अस्सी घाटापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांच्यासाठी रेड कार्पेट अंथरण्यात आले होते. या कार्पेट वेलकमवरून विरोधी पक्षांनी भाजप सरकारला चांगलेच घेरले आहे. हे कार्पेट जवळपास 50 फूट लांब होते.

YSR यांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी योगींवर संताप व्यक्त केला आहे.
YSR यांच्या या ट्विटवर सोशल मीडियावर संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेकांनी योगींवर संताप व्यक्त केला आहे.

तेलंगणा राष्ट्र समितीचे (टीआरएस) सोशल मीडिया समन्वयक वाय. सतीश रेड्डी यांनी योगींच्या या कृतीमुळे पूरग्रस्तांची थट्टा झाल्याची टीका केली आहे. ते एका ट्विटद्वारे म्हणाले - पूरस्थितीचा आढावा घेण्यासाठी आलेल्या सीएम योगींचे रेड कार्पेटवर स्वागत. डबल इंजिनाच्या सरकारची हीच विचारसरणी आहे.

ही पूरग्रस्तांची थट्टा - NSUI

NSUI-BHU चे अध्यक्ष राणा यांनीही या व्हिडिओवरून भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले -योगी आदित्यनाथ पूरग्रस्त भागाचा दौरा करताना मखमली रेड कार्पेटचा वापर केला. ही पूरग्रस्तांची क्रूर थट्टा आहे. हजारो पीडित जीवन जगण्यासाठी संघर्ष करत आहेत.

सपनेही साधला निशाणा

सपनेही या प्रकरणी भाजप सरकारवर निशाणा साधला आहे. सपने म्हटले आहे की, सीएम योगी रेड कार्पेट प्लॅटफॉर्म तयार करून पूरस्थितीचा आढावा घेत आहेत. ते पूरग्रस्तांना भेटण्यासाठी जात आहेत की फोटोबाजी व पर्यटनाचे प्रदर्शन करत आहेत. ही पूरग्रस्तांची थट्टा आहे.

कमी पाणी असलेल्या जागी रेड कार्पेट अंथरले -प्रशासन

प्रशासनाच्या मते, अस्सीच्या ज्या भागात रेड कार्पेट अंथरण्यात आले, त्या ठिकाणी बोट जाईल एवढे पाणी नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना ठराविक जागी नेण्यासाठी खबरदारी म्हणून हा पर्यंत निवडण्यात आला.

सीएम योगींनी बोटीतून वाराणसीतील पूरस्थितीचा आढावा घेतला.

मुख्यमंत्र्यांनी वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिरात अभिषेकही केला.
मुख्यमंत्र्यांनी वाराणसीतील श्री काशी विश्वनाथ मंदिरात अभिषेकही केला.
सोशल मीडियावर योगींचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर यूझर्स वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हीही वाचा...
सोशल मीडियावर योगींचा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. त्यावर यूझर्स वेगवेगळी प्रतिक्रिया देत आहेत. तुम्हीही वाचा...
बातम्या आणखी आहेत...