आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Co Vaccine Will Be Available At Medical Stores From March, Price Rs 900, Serum Vaccine In The Market From September

मार्चपासून बाजारात मिळणार स्वदेशी व्हॅक्सीन:सामान्य लोकांना कोव्हॅक्सीन 900 रुपयात मिळणार; कोवीशिल्ड सप्टेंबरपासून मार्केटमध्ये

नवी दिल्ली8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • संजीवनीपेक्षा कमी नाही व्हॅक्सीन, अफवांपासून दूर राहा

सध्या केवळ फ्रंट वॉरियर्ससाठी आलेली कोरोनाची व्हॅक्सीन मार्चपासून शहराच्या मेडिकल स्टोर्समध्येही मिळू शकते. भारत बायोटेकने याची तयारी सुरू केली आहे. सप्टेंबरमध्ये सीरम इंस्टीट्यूट देखील कोवीशिल्डला बाजारात आणू शकते. याची किंमत 900 ते 1000 रुपये असेल. भारत बायोटेक कोव्हॅक्सीनला 24 मार्चला बाजारात आणण्याच्या प्रयत्नात आहे. गेल्यावर्षी याच दिवशी लॉकडाऊन लावण्यात आले होते.

कंपनीचे नॅशनल हेड शोएब मलिक सांगतात की, कोव्हॅक्सीन सध्या सरकारला पुरवत आहोत. वितरकांशी बैठक घेतल्यानंतर लस साठवण सुविधांची तपासणी केली गेली आहे. लवकरच लस बाजारात आणण्याची तारीख निश्चित केली जाईल. बाजारात लस आणण्यासाठी सरकारच्या मंजुरीची गरज नाही. आम्ही पूर्णपणे तयार आहोत, मार्चच्या अखेरीस ही लस बाजारात आणू.

तर, सीरम इंस्टीट्यूटचे रीजनल सेल्स मॅनेजर अजय द्विवेदी म्हणतात की, सध्या जे उत्पादन होत आहे त्यातील 50% उत्पादन देशात आणि उर्वरित परदेशात पाठवले जात आहे. ऑगस्टपर्यंत आमची लस बाजारात आणली जाईल.

मुलांवर ट्रायलची मंजूरी मिळाली
मलिक यांच्या मते, दोन लस तयार केल्या आहेत त्या 18 वर्षांपेक्षा जास्त वयासाठी आहेत. कोव्हॅक्सीनची मुलांवर ट्रायल करण्याची परवानगी मिळाली आहे. 10 दिवसात देशभरच्या 15 सेंटर्सवर मुलांवर याची ट्रायल सुरू होईल. भारत बायोटेक इंजेक्शन व्हॅक्सीन व्यतिरिक्त नेजल स्प्रेवरही काम करत आहे. डॉक्टर्स प्रयत्न करत आहते की, ज्या रस्त्याने इंफेक्शन येते, त्याच रस्त्यावर ते संपवले जावे.

दोन ऐवजी एका डोजवर रिसर्च
जगभरात कोरोना व्हॅक्सीनचे दोन डोज दिले जात आहेत. यामध्ये दुसरा डोज बूस्टर म्हणून दिला जातोय. मलिक सांगतात की, भारत बायोटेक कोरोना नष्ट करण्यासाठी सिंगल डोजवरही काम करत आहे. चमकी बुखारसाठी देखील जगभरात दोन डोज दिले जातात. मात्र केवळ भारत बायोटेकने याची एक डोजची व्हॅक्सीन बनवली होती.

संजीवनीपेक्षा कमी नाही व्हॅक्सीन, अफवांपासून दूर राहा
व्हॅक्सीनेशनपूर्वी गुरुवारी धर्मगुरू आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांसोबत झालेल्या व्हिडिओ कॉन्फ्रेंसिंगमध्ये सीएम शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले होते की, कोरोनाशी लढण्यासाठी व्हॅक्सीन संजीवनी बूटीपेक्षा कमी नाही. याविषयी कोणीही भ्रमित होऊ नये आणि अफवा पसरवू नका. व्हॅक्सीन पूर्णपणे सुरक्षित आहे.

बातम्या आणखी आहेत...