आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Co WIN Vaccinator APP; All You Need To Know About CoWIN App Registration Process, Certificate Download

कोविनमुळे यश:139 कोटींची लोकसंख्या मॅनेज करतेय अ‍ॅप; कोणत्याही गोंधळाशिवाय होत आहे लसीकरण, सर्टिफिकेटही मिळतेय

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

आजचा दिवस देशासाठी खूप खास आहे. कोविड -19 साथीला पराभूत करण्यासाठी, 16 जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणाने आज 100 कोटी डोस पूर्ण केले आहेत. सुमारे 31% लोकांनी दोन्ही डोस घेतले आहेत. 139 कोटी पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या भारतात लसीकरणाचे काम सोपे नव्हते. कोरोना विषाणू टाळण्यासाठी सर्वांना प्रथम लस मिळवायची होती. लोकांनी घाबरू नये आणि लसीकरणाचे काम आरामात केले जावे यासाठी प्रॉपर चॅनल सर्वात महत्वाचे होते. या चॅनलचे काम को-विन द्वारे केले गेले.

कोविन प्लॅटफॉर्मच्या मदतीने 100 कोटी डोसचा प्रवास सहज आणि वेगाने पूर्ण झाला आहे. हे व्यासपीठ अशा प्रकारे तयार केले गेले की लोक सहजपणे आपली नोंदणी करू शकतील. सरकारने आपले अ‍ॅपही बनवले. हे Android आणि iOS दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरले जाऊ शकते. कोविन प्लॅटफॉर्म पद्धतशीर आहे. हे एकच व्यासपीठ आहे जिथून नोंदणी, लसीकरण आणि प्रमाणपत्र डाउनलोड करता येते.

कोविन प्लॅटफॉर्म काय आहे आणि ते कसे कार्य करते?
हे डिजिटल प्लॅटफॉर्म राष्ट्रीय आरोग्य पोर्टल (NHP) ने तयार केले आहे. कोविड महामारीपासून जिंकण्यासाठी फक्त Co-WIN असे नाव देण्यात आले. यामध्ये Co म्हणजे कोविड आणि WIN म्हणजे विजय. जर तुम्हाला लसीकरणासाठी नोंदणी करायची असेल तर तुम्हाला कोविन प्लॅटफॉर्मवर जावे लागेल. आपण त्याचे अ‍ॅप देखील इंस्ट्रॉल करू शकता किंवा आपण selfregistration.cowin.gov.in वर जाऊ शकता. येथे मोबाइल नंबरने तुमचे रजिस्ट्रेशन होईल. मोबाईल क्रमांकासह नोंदणी करताना काही अडचण आल्यास तुम्ही आधार कार्डासह नोंदणी करू शकता. तुम्ही एकाच लॉगिनसह कुटुंबातील सर्व सदस्यांची नोंदणी करू शकता

लसीकरम रजिस्ट्रेशन प्रोसेस

 • सर्वप्रथम कोविन अ‍ॅप किंवा वेबसाइटवर जा. तुमचा भ्रमणध्वनी क्रमांक टाका. ओटीपी येईल तो टाकून लॉग इन करा.
 • आता आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, पॅन कार्ड, पासपोर्ट, पेन्शन पासबुक, एनपीआर स्मार्ट कार्ड, व्होटर आयडी, युनिक डिसॅबिलिटी आयडी किंवा रेशन कार्ड यापैकी कोणताही एक फोटो आयडी पुरावा निवडा.
 • आपण निवडलेल्या आयडीचा नंबर टाका. यानंतर जेंडर आणि डेट ऑफ बर्थ निवडा.
 • सदस्य जोडल्यानंतर, आपण आपल्या जवळच्या क्षेत्राचा पिन कोड टाका. लसीकरण केंद्रांची यादी येईल.
 • आता लसीकरण तारीख, वेळ आणि लस सिलेक्ट करा. सेंटरवर जाऊन लसीकरण करुन घ्या.
 • लसीकरण केंद्रात, आपल्याला संदर्भ आयडी आणि सीक्रेट कोड द्यावा लागेल. जे तुम्ही नोंदणी केल्यावर मिळतो.
 • अशा प्रकारे, तुम्ही तुमच्या लॉगिनमध्ये इतर सदस्य जोडून तुमच्या लसींची नोंदणी करू शकता.

कोविन प्लॅटफॉर्मची विशेष वैशिष्ट्ये तुम्ही या व्यासपीठावरून लसीकरणासाठी नोंदणी करू शकता. तसेच, तुम्ही तुमचे लसीकरणाचे प्रमाणपत्र डाउनलोड करू शकता. तुम्हाला फक्त या प्लॅटफॉर्मवर लॉग इन करायचे आहे. जर तुम्ही परदेशात जात असाल तर तुम्ही येथून आंतरराष्ट्रीय प्रवास प्रमाणपत्र देखील डाउनलोड करू शकता.

बातम्या आणखी आहेत...