आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Co2 Emissions India; Carbon Emissions In India 2020 Statistics Coronavirus Latest News Updates On India Co2 Emissions

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोनामध्ये पर्यावरण स्वच्छ:भारतात मागील 40 वर्षात पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जनात घट; लॉकडाउनमध्ये विजेची आणि जीवाश्म इंधनाची मागणी कमी झाली

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • देशात मार्चमध्ये कार्बन उत्सर्जन 15% कमी झाले, एप्रिलमध्ये 30% पर्यंत कमी होण्याचा अंदाज

भारतात मागील 40 वर्षात पहिल्यांदाच कार्बन उत्सर्जन कमी झाले आहे. परंतू, हे कमी होण्यामागे फक्त लॉकडाउन हे कारण नाही. सेंटर फॉर रिसर्च ऑन एनर्जी अँड क्लीन एअर (सीआरईए) च्या संशोधकांनी मंगळवारी सांगितले की, लॉकडाउनमुळे विजेची मागणी कमी झाली आहे. रिन्यूएबल एनर्जीचा वापर वाढल्यामुळे जीवाश्म इंधनाची मागणीदेखील कमी झाली आहे.

संशोधकांनुसार, भारतात कार्बन उत्सर्जनच्या 37 वर्षांच्या ट्रेंडला बदलले आहे. 2019 च्या सुरुवातीपासूनच भारतात थर्मल पॉवरची मागणी कमी झाली आहे. देशात मार्चमध्ये कार्बन उत्सर्जन 15% कमी झाले. एप्रिलमध्ये 30% पर्यंत कमी होण्याची शक्यात वर्तवण्यात येत आहे.

कोळशापासून होणाऱ्या विजेची मागणी कमी

संशोधकांचे म्हणने आहे की, लॉकडाउननंतर भारतात विजेची मागणी कमी झाली आहे. यामुळे कोळशाची मागणीदेखील कमी झाली आहे. कोळशापासून होणाऱ्या विजेच्या उत्पादना मार्चमध्ये 15% आणि एप्रिलच्या तीन आठवड्यात 31% कमी आली आहे. तसेच, रिन्यूएबल ऊर्जेची मागणी मार्चमध्ये 6.4% वाढली आणि एप्रिलमध्ये 1.4 % कमी झाली आहे.

सीआरईएच्या संशोधकांचे म्हणने आहे की, कोळशाची मागणी लॉकडाउनपूर्वीच कमी झाली होती. यावर्षी मार्चमध्ये संपणाऱ्या आर्थिक वर्षादरम्यान कोळशाची 2% विक्री कमी झाली. तेव्हापासून आतापर्यंत यात 10% घट झाली आहे. तसेच, आयातदेखील 27.5% कमी झाली आहे.

जगभरात कोळशाच्या उत्पादनात 8 % कमी

इंटरनॅशनल एनर्जी एजेंसीकडून एप्रिलमध्ये जारी आकडेवारीनुसार, जगभरात कोळशाच्या उत्पादनात 8% घट झाली आहे. तसेच, जानकारांचे म्हणने आहे की, जीवाश्म इंधनच्या मागणीत कमी नेहमीसाठी राहणार नाही. लॉकडाउन हटवल्यानंतर थर्मल पॉवरची मागणी आणि कार्बन उत्सर्जन  परत वाढेल.

देशात तेलाची मागणीदेखील कमी झाली आहे. मार्चमध्ये मागच्या वर्षीच्या तुलनेत 18% मागणी कमी झाली आहे. आर्थिक वर्षादरम्यान मागणी फक्त 2% वाढली, जी 22 वर्षातील सर्वात हळू झालेली वाढ आहे. यादरम्यान कच्चा तेलाचे उत्पादनदेखील 5.9% आणि रिफायनरीचे उत्पादनात 1.1% घट झाली.

बातम्या आणखी आहेत...