आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअग्निपथ योजनेवरून बिहार, यूपी, तेलंगणासह 7 राज्यांमध्ये उग्र निदर्शने झाल्यानंतर पोलीस हाय अलर्टवर आहेत. बिहार आणि तेलंगणामधील हिंसाचारामागे कोचिंग इन्स्टिट्यूटची भूमिका समोर आली आहे. बिहारमधील 3 आणि तेलंगणातील एका कोचिंग इन्स्टिट्यूटवर एफआयआर नोंदवण्यात आला आहे. तेलंगणामध्ये एका कोचिंग ऑपरेटरलाही अटक करण्यात आली आहे.
पाटणाजवळील तारेगाना स्टेशनवर झालेल्या गोंधळानंतर मसौढीच्या सर्कल ऑफिसरच्या जबाबावरून मसौढी पोलिस स्टेशनमध्ये एफआयआर दाखल करण्यात आला आहे. यामध्ये तीन कोचिंग पॅराडाईज, आदर्श, बीडीएसच्या संचालकांसह 70 नामांकित आणि 500 अज्ञातांचा समावेश आहे. मसौढी एएसपीच्या म्हणण्यानुसार, बदमाशांना पकडण्यासाठी रात्री अनेक ठिकाणी छापे टाकण्यात येतील.
पाटणाचे DM म्हणाले- व्हॉट्सअॅप चॅटची चौकशी करणार
पाटणाचे जिल्हा दंडाधिकारी चंद्रशेखर सिंह यांनी मीडियाला सांगितले - मसौढी प्रकरणात 6-7 कोचिंग इन्स्टिट्यूटची भूमिका समोर आली आहे. पोलिस या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये मेसेज करून लोकांना भडकावण्यात आल्याची माहिती आम्हाला मिळाली आहे. चौकशीनंतर कठोर कारवाई केली जाईल.
एका अंदाजानुसार, बिहारमध्ये सुमारे 4 हजार कोचिंग संस्था आहेत, त्यापैकी जास्त राजधानी पाटणा येथे आहेत. त्याच वेळी, या संस्थांची वार्षिक उलाढाल सुमारे 500 कोटी आहे.
कोचिंगमधून सुटी मिळाल्यानंतर मोठा गोंधळ झाला
पटनाच्या मसौढी येथील तारेगाना स्टेशनवर शनिवारी सकाळी दगडफेक आणि गोळीबार झाला. आंदोलकांनी स्थानकाची तोडफोड सुरू केली. पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने पेटवून देण्यात आली. आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली. बचावासाठी पोलिसांनी 100 हून अधिक राउंड फायर केले.
तेलंगणातून एका कोचिंग संचालकाला अटक
तेलंगणातील सिकंदराबाद येथे झालेल्या हिंसाचारप्रकरणी सुब्बाराव या कोचिंग डायरेक्टरला पोलिसांनी अटक केली आहे. सुब्बाराव हे लष्कराचे जवान आहेत आणि ते आंध्र-तेलंगणातील सुमारे 8 कोचिंग इन्स्टिट्यूटचे मालक आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुब्बाराव यांनी हकीमपेट आर्मी सोल्जर्स नावाचा व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला होता, ज्यामध्ये लोकांना निदर्शनांसाठी बोलावण्यात आले होते.
एकट्या बिहारमध्ये 700 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान
हिंसक आंदोलनामुळे एकट्या बिहारचे 700 कोटी रुपयांहून अधिक नुकसान झाले आहे. आतापर्यंत 4 दिवसांत 11 लोकोमोटिव्ह आणि ट्रेनच्या 60 बोगी जाळण्यात आल्या आहेत. याशिवाय 20 हून अधिक ठिकाणी रेल्वे मालमत्ता, दानापूरमध्ये पार्सलच्या डझनहून अधिक गाड्या आणि पाटणासह राज्यातील 15 जिल्ह्यांतील रेल्वे मालमत्ता जाळण्यात आल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.