आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Coal Crisis : 50,000 Laborers Working Day And Night In 63 Mines To Keep The Country Bright

दैनिक भास्करचा ग्राउंड रिपोर्ट:देश प्रकाशमान ठेवण्यासाठी 63 खाणींत 50 हजार मजूर-अधिकारी अहोरात्र कार्यरत

नवी दिल्ली6 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • धनबादहून विकास सिंह, संजय मिश्रा आणि रांचीहून पंकज त्रिपाठी
  • कोल इंडियाच्या अध्यक्षांचा दावा- पुढील ७ दिवसांत कोळशाचे संकट संपणार

कोळशाच्या तुटवड्यामुळे देशात प्रथमच वीज संकट उद्भवले आहे. १७ राज्यांत घोषित-अघोषित वीज कपात सुरू आहे. विजेची मागणी सतत वाढत आहे, त्यामुळे संपूर्ण देश कोल इंडियाकडे अपेक्षेने पाहत आहे. कारण कोल इंडियाच्या तीन राज्यांतील खाणींतून देशाच्या एकूण मागणीपैकी ८०% कोळसा मिळतो. त्यापैकी २४% वाटा झारखंडचा आहे. देशाला वीज संकटापासून वाचवण्यासाठी अधिकारी घरून थेट खाणींत पोहोचत आहेत. ५० हजार मजूर रात्रंदिवस कोळसा आणि पाणी काढत आहेत. त्यामुळे ६३ खाणींतून १२ दिवसांत २२ लाख टन कोळशाचा पुरवठा झाला आहे. दररोज यूपी, बिहार, पंजाब, हरियाणा, तामिळनाडू, प. बंगाल, कर्नाटकात ३७ रॅक कोळसा पाठवला जात आहे. तो गेल्या वर्षापेक्षा २५% जास्त आहे. सीसीएलच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, खाणींतून रोज १.८१ हजार टन कोळसा उत्पादन होत आहे. कोल इंडियाचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी सांगितले की, नव्या प्रयत्नांमुळे एक आठवड्यात कोळशाचे संकट दूर होऊ शकते.

को‌‌ळसामंत्री जोशींनी मान्य केले-कोळशाचा तुटवडा झाला होता, अाता स्थिती सुधारत आहे
काेरबा (छत्तीसगड) | केंद्रीय कोळसामंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, मागणी वाढल्याने कोळशाचा तुटवडा झाला होता, पण आता स्थितीत वेगाने सुधारणा होत आहे. जोशी बुधवारी येथे खाणींच्या पाहणीसाठी आले होते. जोशी म्हणाले, वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा मंगळवारी २० लाख टनांपेक्षा जास्त झाला. वीज प्रकल्पांत कोळशाचा पुरेसा साठा सुनिश्चित करण्यासाठी कोळशाचा पुरवठा वाढवला जात आहे. कोल इंडियाने सांगितले की, गेल्या दोन दिवसांत वीज प्रकल्पांना कोळशाचा पुरवठा १६.२ लाख टनांवर गेला होता. केंद्रीय वीज प्राधिकरणाच्या राष्ट्रीय वीज पोर्टलनुसार, अनेक राज्यांत प्रकल्प आपल्या क्षमतेपेक्षा कमी वीज उत्पादन करत आहेत.

मागणीपेक्षा वीजपुरवठा ६ हजार मेगावॅटने कमी, आधी ११ हजारांची तूट
नवी दिल्ली| पाॅवर सिस्टिम ऑपरेशन कॉर्पोरेशन लि. ने (पोसोको) बुधवारी रात्री उशिरा माहिती दिली की, कोळशाच्या तुटवड्यामुळे वीज युनिट्सच्या एकूण क्षमतेत १२ ऑक्टोबर रोजी असलेला ११ हजार मेगावॅटचा तुटवडा १३ ऑक्टोबरला घटून तो ६ हजार मेगावॅट राहिला. म्हणजे वीजनिर्मितीत सुधारणा झाली. यात पुरवठा सुधारला आहे. तिकडे कोल इंडियाने सांगितले की, गेल्या दोन दिवसांत दररोज १.८८ दशलक्ष टन कोळसा विविध प्रकल्पांसाठी पाठवला जात आहे. हे प्रमाण १.७५ दशलक्ष टनांच्या तुलनेत अधिक आहे. कोल इंडियाच्या मते त्यांच्या पिटहेडवर ४० दशलक्ष टन कोळसा उपलब्ध आहे. ऑक्टोबरच्या पहिल्या १२ दिवसांत कोळशाचे ७% जास्त उत्पादन केले गेले. दसऱ्याच्या सुटीनंतर कामगार कामावर परतल्यानंतर खननाला आणखी गती येईल, अशी अपेक्षा आहे.

खाणीच्या एका भागात पाणी साचले आहे, दुसऱ्या भागातून कोळसा काढला जातोय, कुइयां खाणीतून पुढील ७ दिवसांत १३ मीटर पाणी उपसण्याचे आव्हान
पावसामुळे बीसीसीएलच्या लोदना भागातील एकीकृत नाॅर्थ तिसरा- साऊथ तिसरा जीनगोरा (एनटी-एसटी जीनगोरा) खाणीचा एक मोठा भाग पाण्यात बुडाल्याने पाणी भरलेला भाग सुरुंग लावून वेगळा करत दुसऱ्या भागात उत्पादन सुरू ठेवले. बीसीसीएलच्या खाणींशिवाय दोन आऊटसोर्सिंग पॅच चालू आहेत. सर्वांच्या सुट्या रद्द केल्या आहेत. परिणामी उत्पादन २५% वाढले आहे. खाणीचे प्रभारी पंकज कुमार म्हणाले, नोव्हेंबरमध्ये रॅकची संख्या ५, डिसेंबरपर्यंत ७ करण्याची योजना आहे. आधी या तीन खाणींमधून दरदिवशी ७ ते ८ टन कोळशाचे उत्पादन होत होते. ते मागील दहा दिवसांपासून वाढवून १० हजार टनापर्यंत नेण्यात आले. अशाच प्रकारे कुइयां खाणीतही १३ मीटरपर्यंत पाणी साचले आहे. हे पाणी केवळ ७ दिवसांत उपसण्याचे लक्ष्य आहे. खाणीच्या ज्या भागात पाणी साचलेले नाही त्या भागातील खनन वेगाने सुरू करण्यात आले. येथे ९०० मजूर तीन पाळ्यांत २४ तास काम करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...