आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Coast Guard Prepared To See Threat Of Storm, Directing Fishermen To Return To Ports

आता पूर्वेकडून येणाऱ्या वादळाचा धोका:ओडिशा-बंगालसह 5 राज्यांना केंद्राचा अलर्ट, कोविड रूग्णांचे स्थलांतर करण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

तौक्ते चक्रीवादळानंतर आता 'यास' वादळाचा धोका देशासमोर आहे. हे वादळ उत्तर अंदमान समुद्र आणि लगतच्या बंगालच्या पूर्व-मध्य उपसागरातून निर्माण होत आहे. 24 मे पर्यंत या वादळाची चक्रीवादळात रुपांतर होण्याची शक्यता आहे. हा धोका लक्षात घेता केंद्राने आंध्रप्रदेश, ओडिशा, बंगाल, तामिळनाडू आणि अंदमान निकोबारला अलर्ट केले आहे.

केंद्रानुसार 26 मे रोजी वादळ बंगालच्या किना-यावर धडकेल. कोविड रुग्णांना सुरक्षित ठिकाणी नेण्यासाठी तयारी करण्याचे केंद्राने पाचही राज्यांना सांगितले आहे. सर्व हॉस्पिटलमध्ये पुरेसा पॉवर बॅकअप ठेवावा, असेही सांगण्यात आले आहे.

'यास' चक्रीवादळ : केंद्राच्या 5 राज्यांना गाइडलाइन

 • आपतकालीन ऑपरेशन सेंटर आणि नियंत्रण कक्ष सक्रिय करा. नोडल अधिकारी तैनात करा आणि त्याचे संपर्क तपशील आरोग्य मंत्रालयाला उपलब्ध करा.
 • किनारी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये हॉस्पिटल आपत्ती व्यवस्थापन योजना सुरू करा. या जिल्ह्यातील रुग्णालयांमधील आपतकालीन परिस्थिती तयारीचा आढावा घ्यावा.
 • जे ठिकाण वादळाच्या मार्गावर येत आहेत, अशा ठिकाणावरील सामुदायिक वैद्यकीय केंद्रे आणि रुग्णालयांमधून रुग्णांना उंच ठिकाणावरील मोठ्या रुग्णालयात हलवण्यासाठी ऍडव्हान्स प्लॅन तयार करा.
 • कोविड व्यवस्थापनासाठी देखरेखीचे युनिट, आरोग्य संघटनांनी साथीच्या रोगाव्यतिरिक्त डेंग्यू, मलेरिया, सर्दी-खोकला, यासारख्या आजारांसाठी देखील तयार राहावे.
 • चक्रीवादळग्रस्त भागातील कोविड केंद्रांसह सर्व आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमध्ये पुरेसे मनुष्यबळ असले पाहिजे. ही सर्व केंद्रे पूर्णपणे कार्यरत असणे आवश्यक आहे.
 • चक्रीवादळग्रस्त भागातील रुग्णालयांमध्ये, लॅबमध्ये आणि लसीच्या कोल्ड चेन, ऑक्सिजन उत्पादन युनिट आणि इतर सहायक वैद्यकीय सुविधांमध्ये पुरेशा प्रमाणात बॅकअप असावे. या व्यतिरिक्त या रुग्णालयांमध्ये वीज, पाणी व इंधनाचा पुरवठादेखील पुरेसा आहे की नाही हे सुनिश्चित करावे.
 • जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतुकीवर परिणाम होऊ शकतो. आणीबाणीचा विचार करता आवश्यक औषधांचा एक्स्ट्रॉ स्टॉक भरून ठेवावा. ORS, क्लोरीनच्या गोळ्या, ब्लीचिंग पावडर आणि कोरोनावर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या इतर औषधांची व्यवस्था करून ठेवावी. कोविड आणि नॉन कोविड या दोन्ही हॉस्पिटलसाठी हे नियम आवश्यक आहेत.
बातम्या आणखी आहेत...