आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

नवी दिल्ली:शाळेचे कँटीन व गेट परिसरात कोल्ड्रिंक्स, चिप्स विकणे गुन्हा, फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथॉरिटीने आखले नियम

नवी दिल्ली | पवनकुमार3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • नियमांचे उल्लंघन केल्यास तुरुंगवासाचीही शिक्षा सुनावणार

शाळेचे कँटीन आणि गेटच्या ५० मीटर परिसरात मुलांना कोल्ड्रिंक्स, चिप्स, छोले भटुरे, पिझ्झा, बर्गर, भजी आदी जंक फूडची विक्री करणे आता गुन्हा ठरणार आहे. विक्रीसह अशा पदार्थांचा प्रचार-जाहिरातीही गुन्हा समजला जाईल. नियमांचे उल्लंघन केल्यास फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅक्टनुसार दंड किंवा तुरुंगवासही भोगावा लागू शकतो.

फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड अॅथॉरिटी ऑफ इंिडयाने (एफएसएसएआय) शाळांसाठी नियम आखून दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या मंजुरीनंतर त्याची अधिसूचना जारी होणार आहे. यानंतर शाळेच्या आत किंवा ५० मीटर परिघात दुकान वा फूड कोर्ट चालवणाऱ्यांना आवश्यक ती उपाययोजना करण्यासाठी वेळ दिला जाणार आहे. त्यांना जंक फूडशी संबंधित पोस्टर-बॅनर, होर्डिंग्जही हटवावे लागणार आहेत. हे नवीन नियम जुलै २०२१ पासून लागू होणार आहेत.

कँटीन बोर्डावर द्यावी लागेल माहिती :
आता शाळेचे कँटीन चालवण्यासाठी परवाना घ्यावा लागणार आहे. तेथील खाद्यपदार्थांवर नजर ठेवण्यासाठी शाळेला समन्वयकाची नेमणूक करावी लागणार आहे. मुलांना काय खाऊ घालायचे आणि काय नाही याची माहितीही कँटीनमधील बोर्डावर ठेवावी लागेल. विद्यार्थ्यांना एखाद्या विशेष प्रसंगी आइस्क्रीम दिली जाऊ शकेल.

जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद
अन्न सुरक्षा कायद्याचे उल्लंघन केल्यास सहा महिने ते थेट जन्मठेपेपर्यंतच्या शिक्षेची तरतूद आहे. विविध गुन्ह्यांसाठी विविध प्रकारच्या शिक्षांची तरतूद आहे. अस्वच्छ खाद्यपदार्थांसाठी १ लाख रुपये, वाईट गुणवत्तेच्या पदार्थांसाठी दाेन लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची तरतूद आहे. एखादा पदार्थ खाऊन जिवाला धोका निर्माण झाल्यास जन्मठेपेपर्यंतची शिक्षाही दिली जाऊ शकते.