आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन रविवारी ३९ व्या दिवशीही सुरू होते. हाडे गोठवणारी थंडी, पाऊस, रस्त्यावर साचलेला चिखल, गळणारे तंबू, भिजलेली पांघरुणे आणि लाकडे अशा अवस्थेतही शेतकरी दिल्लीच्या वेगवेगळ्या सीमांवर ठाण मांडून आहेत. दरम्यान, सिंघू आणि टिकरी बाॅर्डरवर आणखी ४ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. त्यात एका १८ वर्षीय युवकाचाही समावेश आहे. शेतकरी आंदोलनादरम्यान आतापर्यंत आत्महत्या आणि इतर कारणांमुळे ५४ शेतकऱ्यांना प्राण गमवावे लागले. संयुक्त किसान मोर्चाचे सदस्य अभिमन्यू कोहार यांनी सांगितले की, शनिवारी रात्रीपासून पाऊस सुरू झाला बचावासाठी शेतकऱ्यांनी वाॅटरप्रूफ तंबूंची व्यवस्था केली, पण थंडी आणि पाणी साचणे या समस्यांपासून हे तंबू वाचवू शकत नाहीत.आंदोलनात सहभागी महिला, मुले आणि ज्येष्ठ शेतकऱ्यांना जास्त त्रास झाला.
शेतकरी-सरकारमध्ये विज्ञान भवनात आज चर्चा
सरकारशी चर्चेसाठी शेतकरी संघटनांचे नेते सोमवारी विज्ञान भवनात येतील. कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांची समजूत काढण्यात यश येईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. मात्र, तीन कायदे मागे घेण्याच्या पद्धतीवरच चर्चा व्हावी, अशी शेतकऱ्यांची इच्छा आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.