आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • National
 • Collect Nasal Samples From Dead Bodies For Covid 19 Test Before Sending To Mortuary Says Indian Council For Medical Research

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

आयसीएमआरची गाइडलाइन:कोरोना संशयित मृतदेहाच्या नाकाच्या सँपलची चाचणी, रिपोर्ट आल्यानंतरच बॉडी कुटुंबियांच्या स्वाधीन केली जाणार

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
 • कॉपी लिंक
 • सर्व कोरोना संशयितांच्या मृत्यूनंतर इमरजेंसी वॉर्डमध्येच नाकाचे सँपल घेऊन पीसीआर टेस्टसाठी पाठवले जाईल

इंडियन काउंसिल ऑफ मेडिकल (आयसीएमआर) रिसर्चच्या नवीन गाइडलाइननुसार, मरण पावलेल्या कोरोना संशयिताला मर्च्युरीमध्ये पाठवण्यापुर्वी कोरोना चाचणी केली जाईल. मृतदेहाच्या नाकातून सँपल घेऊन चाचणीसाठी पाठवले जाईल आणि रिपोर्ट आल्यानंतरच डेड बॉडी प्रशासनाच्या हवाली केली जाईल. आयसीएमआरने आपल्या 'स्टँडर्ड गाइडलाइन फॉर मेडिको लीगल अटॉप्सी इन कोव्हिड-19 डेथ इन इंडिया'मध्ये म्हटले की, प्रक्रिया पूर्ण झाल्यावर आणि रिपोर्ट आल्यानंतरच बॉडी मर्च्यूरीमधून रिलीज केली जाईल. 

 • सामान्य डेड बॉडीलाही संशयिताच्या प्रक्रियेतून जावे लागेल

गाइडलाइननुसार, सर्व कोरोना संशयितांच्या मृत्यूनंतर इमरजंसी वॉर्डमध्येच नाकाचे सँपल घेऊन पीसीआर टेस्टसाठी पाठवला जाईल. इतर सामान्य रुग्णांच्या मृत्यूनंतरही डेड बॉडीला संशयितांच्या प्रक्रीयेतून जावे लागेल. त्यानंतरच मृतदेह कुटुंबियांच्या स्वाधीन केले जाईल.

 • गाइडलाइनमधील 6 महत्वाच्या गोष्टी

खोटे निगेटिव्ह प्रकरणे खूप कॉमन, म्हणून ही प्रक्रिया गरजेचीआहे. गाइडलाइनमध्ये सांगितले आहे की, खोटी निगेटिव्ह प्रकरणे समोर येत आहेत, त्यामुळे कोरोना हिस्ट्री नसलेल्या रुग्णांच्याही मृतदेहाला या प्रक्रियेतून जाणे गरजेचे आहे.

 • प्लास्टिक बॅग न उघडता मृतदेहाची ओळख पटवली जाईल

डेड बॉडीजवळ दोनपेक्षा जास्त कुटुंबातील सदस्य थांबू शकत नाहीत. यादरम्यान त्यांना मृतदेहापासून एक मीटर दूर थांबावे लागेल. प्लास्टिक बॅग उघडल्याशिवाय त्यांना मृतदेहाची ओळख पटवावी लागेल.

 • अंत्यविधीदरम्यान पाच पेक्षा जास्त लोक नसावेत

गाइडलाइनचे पाल व्हावे म्हणून मॉनिटरिंग एजेंसी संबंधित लोक अंत्यविधीदरम्यान उपस्थित असतील. यादरम्यान मृत व्यक्तीच्या कुटुंबातील पाच पेक्षा जास्त लोक उपस्थित नसावेत.

 • दफनविधी झाल्यानंतर वरचा भाग सिमेंटने भरला जाईल

ज्या समाजात जमिनीत पुरण्याची प्रथा आहे, अशा मृतदेहांना पुरल्यानंतर वरचा भाग सिमेंटने पॅक केला जाईल. गाडण्यासाठी खोदण्यात येणाऱ्या खड्याची खोली 6-8 फूट असावी. संभव असल्यास अंतियविधी इलेक्ट्रिक पद्धतीने केला जावा. 

 • या गोष्टींवर बंदी

असे धर्म, ज्यात मृतदेहांना अंघोल घातली जाते, जवळ घेतले जाते, अशा प्रकारच्या परंपरांवर निर्बंध असेल. अंत्यविधी झाल्यानंतर राख(अस्ती)ठेवण्याची परवानगी असेल, कारण यातून कोणताच धोका नाही. मृत व्यक्तीचे वयक्ती सामान जसे, कपडे, इत्यादींना डिस्पोजल केले जावे. इतर वस्तुंना अल्कोहोलने धुवून वापरण्यात यावे.

बातम्या आणखी आहेत...