आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • College Students Prepare AC PPE Kit For Corona Warriors, Keeps It Cool During Summer Season

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना योद्ध्यांसाठी अविष्कार:कराडच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी तयार केली AC असणारी पीपीई किट, उन्हाळ्यात ठेवेल कूल-कूल

पुणे2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कराडच्या कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी AC असणारी PPE किट तयार केली आहे.

कोरोना व्हायरसविरोधातील लढाईमध्ये PPE किट सर्वात जास्त मदतगार ठरत आहे. खरेतर उष्णतेमुळे हे घालताना त्रास होतो. घामामुळे PPE किट लवकर खराब होण्याची शक्यता असते. आता ही समस्या दूर करण्यासाठी कराडच्या कृष्णा इंस्टीट्यूट ऑफ मेडिकल सायन्सच्या विद्यार्थ्यांनी AC असणारी PPE किट तयार केली आहे. ही किट घालणारा अनेक तास कूल राहू शकतो.

म्हणून गरज निर्माण झाली
ते तयार करणारे सुहास देशमुख म्हणाले की ही पीपीई किट 'रियूज' केली जाऊ शकते. कोरोना रूग्णांवर उपचार करताना डॉक्टरांना 6-6 तास किट घालावे लागते. पूर्णपणे लॉक झाल्यामुळे हवा प्रवेश करू शकत नाही. ज्यामुळे कामाच्या वेळी डॉक्टरांना उष्णतेचा सामना करावा लागतो. ते (आरोग्य कर्मचारी) वारंवार थंड होण्यासाठी त्याची चेन उघडतात आणि यामुळे संक्रमणाचा धोका वाढतो. हा धोका कमी करण्यासाठी अशी किट तयार करण्याची कल्पना आली.

या PPE किटमध्ये काय खास

  • यामध्ये 0.1 कायक्रोनचा हेपा फिल्टर लावण्यात आला आहे. हे रुग्णालयातील वातावरणातील हवा फिल्टर करुन आत पोहोचवते.
  • किटच्या मागच्या भागात लावलेले उउपकरण केवळ एक किलोग्रामचे आहे. हे पाईपच्या माध्यमातून गरम हवा बाहेर काढून थंड हवा पापाई किटमध्ये पोहोचवते.
  • हे उष्णतेच्या वातावरणात गार हवा देते आणि थंडीच्या वातावरणात गरम हवेने शरीराला ताजे ठेवते.
  • ही पीपीई किट केवळ कोरोना नाही तर कोणत्याही प्रकारच्या इंफेक्शनदरम्यान वापरली जाऊ शकते.
  • बॉर्डरवर तैनात आर्मीच्या जवानांसाठीही ही PPE किट फायदेशीर ठरु शकते.

यूनिव्हर्सिटीचे संचालक डॉ. डीके अग्रवाल यांनी सांगितले की, हे केवळ प्रोटोटाइप आहे आणि येणाऱ्या काळात काही इतर अप्रूव्हलनंतर याचे मोठ्या प्रमाणात प्रोडक्शन केले जाऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...