आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सर्वसामान्यांना दिलासा:व्यावसायिक सिलिंडर 100 रुपयांनी स्वस्त, घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे, नवे दर आजपासून लागू

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महागाईची झळ सोसत असलेल्या सामान्यांना व व्यावसायिकांना सप्टेंबरच्या सुरूवातीलाच काहीसा दिलासा मिळाला आहे. तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये 100 रूपयांनी घट केली आहे.

घरगुती सिलिंडरच्या किंमतीमध्ये मात्र कोणताही बदल करण्यात आलेला नाही. त्यामुळे तुर्तास सामान्यांना थेट दिलासा मिळाला नसला तरी तेल कंपन्यांच्या निर्णयामुळे देशभरात व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीमध्ये मोठी घट झाली आहे. नवीन दर 1 सप्टेंबर 2022 पासून म्हणजे आजपासूनच लागू झाले आहेत.

असे असतील नवीन दर

  • देशाची राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडरचे दर 91.50 रुपयांनी कमी झाले. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर सध्या 1,885 रुपयांना मिळत आहे.
  • मुंबईत व्यावसायिक सिलिंडरचे दर 92.50 रुपयांनी कमी झाल्यानंतर सिलिंडर 1844 रुपयांना विकला जात आहे.
  • कोलकात्यात 100 रुपयांच्या दर कपातीनंतर सिलिंडर 1995 रुपयांना विकला जात आहे.
  • चेन्नईमध्ये एकूण 96 रुपयांची कपात करण्यात आली आहे. येथे व्यावसायिक सिलिंडर 2,045 रुपयांना मिळत आहे.

ऑगस्टमध्येही कमी झाले होते दर

यापूर्वी ऑगस्टमध्येही तेल कंपन्यांनी व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतींमध्ये कपात करून किरकोळ व्यावसायिकांना दिलासा दिला होता. ऑगस्टमध्ये व्यावसायिक सिलिंडरच्या किंमतीत 36 रुपयांची कपात करण्यात आली होती. देशभरात ही कपात करण्यात आली होती.

घरगुती सिलिंडरचे दर जैसे थे

दुसरीकडे, 14.2 किलोग्रॅमच्या घरगुती सिलेंडरच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. 6 जुलैपासून या सिलिंडरचे दर जैसे थे आहेत. मुंबईत घरगुती सिलिंडर 1,052 रुपयांना मिळत आहे. याशिवाय घरगुती सिलिंडरचे दर दिल्लीत 1,053 रुपये, कोलकात्यात 1,079 रुपये आणि चेन्नईमध्ये 1,068 रुपये आहे.

आर्थिक बाबतीत 3 मोठे बदल

1. NPS नियमांमध्ये मोठे बदल

1 सप्टेंबरपासून राष्ट्रीय पेन्शन योजनेतही मोठा बदल करण्यात आला आहे. आजपासून NPS खाते उघडल्यावर पॉइंट ऑफ प्रेझेन्स (POP) वर कमिशन आकारण्यात येणार आहे. 10 ते 15,000 रुपयांपर्यंत हे कमिशन असणार आहे.

2. पंजाब नॅशनल बँकेत KYC आवश्यक

पंजाब नॅशनल बँकेच्या ग्राहकांसाठी केवायसी अनिवार्य करण्यात आले आहे. सर्व ग्राहकांनी 31 ऑगस्टपूर्वी त्यांचे केवायसी करून घ्यावे, असे निर्देश यापूर्वीच बँकेने दिले होते. KYC प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी तुम्ही बँकेच्या शाखेशी संपर्क साधू शकता. तुम्ही तुमचे खाते 31 ऑगस्टपर्यंत अपडेट केले नसेल, तर तुम्ही तुमच्या खात्यातून पैसे ट्रान्सफर करू शकणार नाही, असे बँकेतर्फे सांगण्यात आले आहे.

3. पीएम किसान योजनेसाठी KYC अनिवार्य

पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थ्यांना 31 ऑगस्टपूर्वी ई-केवायसी करणे आवश्यक होते. केवायसी अपडेट केले नसल्यास पुढील हप्ता मिळण्यात अडचणी येऊ शकतात. योजनेसाठी सरकारने केवायसी अनिवार्य केले आहे.

बातम्या आणखी आहेत...