आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्सिंग:राष्ट्रकुल निवड चाचणी; मेरी कोमची माघार, नीतूला संधी

नवी दिल्ली15 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सहा वेळच्या विश्वविजेत्या बॉक्सर मेरी कोमने शुक्रवारी आगामी राष्ट्रकुल स्पर्धेच्या आयाेजित निवड चाचणीतून माघार घेतली. पायाला गंभीर दुखापत झाल्याने आपण माघार घेत असल्याची प्रतिक्रिया तिने दिली. इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये निवड चाचणीचे आयाेजन करण्यात आले. २०१८ मधील राष्ट्रकुल चॅम्पियन मेरी कोमला ४८ किलो वजन गटाच्या पहिल्याच फेरीत दुखापत झाली तरीही तिने अंतिम चारपर्यंत धडक मारली. मात्र, हरियाणाच्या नीतूविरुद्ध होणाऱ्या उपांत्य लढतीतून तिने माघार घेण्याची घोषणा केली. त्यामुळे नीतूला विजयी घोषित करण्यात आले. यासह तिने ४८ किलो वजन गटाची फायनल गाठली. या दुखापतीनंतर मेरी कोमने तत्काळ रुग्णालय गाठले. आगामी जुलै महिन्यात राष्ट्रकुल स्पर्धेचे आयाेजन करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...