आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Community Marriage Ceremonies In Surat Yielded 25% Of The Flesh Through The Body Donation Resolution

सामाजिक बदल:सुरतमध्‍ये सामुदायिक विवाह सोहळ्यांत देहदान संकल्पाने 25 % देह मिळाले

जल्पेश कालेला / सुरत20 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुजरात नेहमीच सामाजिक बदलांची मोठी उदाहरणे समोर ठेवत आला आहे. या वेळी डायमंड सिटी म्हणून प्रसिद्ध असलेल्या सुरतने देशाला एक मोठी शिकवण दिली आहे. येथे राज्यात सर्वाधिक देहदान झाले आहे. गेल्या पाच वर्षांत गुजरातेत ६०५ देहदान झाले. यात ४०% (२४१) वाटा सुरतचा आहे. तर या काळात भावनगरमध्ये १५४, राजकोट ५९, अहमदाबाद ७९, बडोदा २९ अन् जामनगरमध्ये ४३ देहदान झाले.

सुरतमध्ये राबवण्यात आलेले अनोखे अभियान हे या जागरूकतेचे कारण आहे. येथे सामुदायिक विवाह सोह‌ळे आणि अन्य सार्वजिनक कार्यक्रमांत देहदानाबात जागरूकता निर्माण करण्यासाठी संकल्पपत्र भरून घेतले जातात. परिणामी गेल्या पाच वर्षांत सुरतेत २४१ देहदान झाले. यातील २५% देह सामुदायिक विवाह सोहळ्यांतील संकल्पांतून मिळाले. दानात मिळालेले हे देह राज्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांत अभ्यासासाठी दिले जातात. देशभरात वैद्यकीय क्षेत्र प्रॅक्टिससाठी देहांच्या तुटवड्याचा सामना करत आहे. हे लक्षात घेऊन इंडियन रेडक्रॉस संस्थेकडून जागरूकतेसाठी वेळोवेळी कार्यक्रम आयोजित केले जातात. अर्ज भरून घेण्याचे काम संस्थेनेच सुरू केले होते. ही संस्था २००६ पासून कार्यरत आहे. सौराष्ट्र पटेल समाज ट्रस्टचे प्रमुख कानजी भालाणा सांगतात, ‘देहदानाबाबत लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी संस्थेने तीन दशकांपूर्वी अभियान सुरू केले होते. याअंतर्गत सामुदायिक विवाहांत देहदानाची घोषणा करणाऱ्यांचा मंचावर सन्मान केला होता. ते सांगतात, २००३ मध्ये त्यांचे वडील आणि २००५ मध्ये त्यांच्या भावाचेही देहदान करण्यात आले होते. गुजरात विकास समितीचे प्रवीण भालाणा सांगतात, ‘संस्थेकडून २२ वर्षांत सामुदायिक विवाह सोहळ्यांत देहदान व नेत्रदान जागरूकता अभियान राबवले. संकल्प सोडणाऱ्यांच्या निधनांतर त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देतो. लोकदृष्टी बँकेचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल शिरोया सांगतात, ‘माझ्या वडिलांनी मला सांगितले होते, आपल्या कुटुंबात ५ डॉक्टर आहेत. एखाद्याने देहदान केल्याने तुम्ही वैद्यकीय शिक्षण घेऊ शकलात. त्यामुळे आपल्या कुटुंबातूनही असे व्हायला हवे. तेव्हापासून त्या परंपरेचे पालन करत आहोत.

बोन बँक : गरीब विद्यार्थ्यांना हाडे मोफत मिळतात देहदान करण्याच्या व्यवस्थेसह बोन (हाड) बँकही तयार केली जाते. वैद्यकीयच्या विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी सिंथेटिक किंवा मूळ हाडांचा संच खरेदी करावा लागतो. हा संच जवळपास १२ हजार रुपयांना मिळतो. गरीब विद्यार्थ्यांना तो मोफत मिळावा, यासाठी बोन बँक तयार करण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...