आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्राहकांवर संशोधन:महागाईचा सामना करण्यासाठी कंपन्या बनवताहेत छोटे पॅक

नवी दिल्ली6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वाढत्या महागाईचा सामना करण्यासाठी एफएमसीजी (साबण, पेस्टसारख्या रोजच्या गरजेच्या सामानाचे) भाव वाढवण्यापेक्षा कंपन्यांनी पॅकचे वजन कमी करण्याचे धोरण अंगीकारले आहे. त्यामुळे ग्राहकांना आता पहिल्यापेक्षा जास्त खरेदी करावी लागत आहे. कारण छोटे पॅक तुलनेने लवकर संपतात. ग्राहकांवर संशोधन करणाऱ्या फर्म कँटरच्या अहवालानुसार, महागाईमुळे ग्राहक छोट्या पॅककडे आकर्षित झाले होते. मात्र त्यांना वारंवार एफएमसीजी प्रॉडक्टची खरेदी करावी लागत आहे. याचा फायदा बाजाराची नस ओळखणाऱ्या स्थापित एफएमसीजी कंपन्यांना होत आहे. कँटरच्या मते, लॉकडाऊन निघाल्यानंतर मोठ्या एफएमसीजी ब्रँडच्या कंझ्युमर रीच पॉइंट (सीआरपी) म्हणजेच बाजारापर्यंत पोहोच, दाखल आणि खरिदीच्या संख्येत वाढ झाली आहे. अनेक मोठ्या ब्रँडची भागीदारी वाढली आहे तर छोटे-मध्यम ब्रँड भागीदारी गमवत आहेत.

बातम्या आणखी आहेत...