आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्टार्टअपसाठी प्रोत्साहन:ड्रोनचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्या पीएलआय योजनेत

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय विमान वाहतूक मंत्रालयाने भारतीय कंपन्या आणि स्टार्टअपसाठी प्रोत्साहन योजनेची(पीएलआय) सुरुवात करण्यासाठी दिशानिर्देश जारी केले आहेत. यासाठी सरकारकडून १२० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. अशा कंपन्या ज्यांचा वार्षिक व्यवसाय दोन कोटी रुपयांचा आहे,त्या या पीएलआय योजनेचा फायदा घेऊ शकतात. विमान वाहतूक मंत्रालयाकडून वित्त वर्ष २०२२-२३ ते २०२४-२५ साठी १२० कोटी रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. प्रति कंपनी जास्तीत जास्त ३० कोटी रुपयांहून जास्त रक्कम पीएलआय योजनेअंतर्गत दिले जाऊ शकते. ही व्यवस्था सरकारकडून आत्मनिर्भर भारताअंतर्गत देशातील छोट्या आणि मध्यम कंपन्यांशिवाय स्टार्टअप चालवणाऱ्या व्यावसायिकांसाठी केली आहे. ड्रोनच्या वाढत्या बाजारात ड्रोनचे सुटे भाग बनवणाऱ्या कंपन्यांसाठी ही योजना आखण्यात आली आहे.

बातम्या आणखी आहेत...