आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ट्विटरमध्ये कर्मचारी कपात:... तर घरी परत जा, ऑफिस बंद आहे; भारतातील 200 पैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना कंपनीचा ई-मेल

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदी केल्यानंतर जगभर कर्मचारी कपात सुरू केली असून कंपनीने शुक्रवारी भारत व अमेरिकेसह जगभरातील आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या नोकरीबाबत ई-मेल पाठवले आहेत. भारतातील २०० हून अधिक कर्मचाऱ्यांपैकी बहुतांश कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आले आहे. इंजिनिअरिंग, सेल्स, मार्केटिंग आणि कम्युनिकेशन अशा विभागातील कर्मचाऱ्यांची कपात करण्यात आली आहे.

सूत्रांनुसार, भारतातील मार्केटिंग व कम्युनिकेशन या विभागातील सर्वच कर्मचारी काढले आहेत. आपल्या साथीदारांना नोकरीवरून काढल्याचे किंवा कायम ठेवल्याचे मेल आले असल्याचे ट्विटर इंडियाच्या एका कर्मचाऱ्याने सांगितले. गेल्या आठवड्यात सीईआे पराग अग्रवाल यांच्यासह पाच बड्या अधिकाऱ्यांना ट्विटरने काढून टाकले होते. दरम्यान, याविरुद्ध सॅनफ्रान्सिस्को कोर्टात खटला दाखल करण्यात आला आहे.

ट्विटर डाऊन : शुक्रवारी ट्विटर डाऊन झाल्याच्याही बातम्या आहेत. काही लोकांनी साईटबद्दल तक्रारी केल्या. काही जणांना ‘पुन्हा प्रयत्न करा...’ असे मेसेज येत आले आहेत.

... तर घरी परत जा, ऑफिस बंद आहे
गुरुवारी कंपनीने कर्मचाऱ्यांना ई-मेल करून बजावले होते की, तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा ऑफिसच्या मार्गावर असाल तर घरी परत जा. ऑफिस बंद आहे. तुमचे नाव कपातीत आहे की नाही हे शुक्रवारी कळवले जाईल.

बातम्या आणखी आहेत...