आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • National
 • Pawanhans Helicopter Company Sold By Central Govt For Rs 211 Crore, The Company Was Always In The Spotlight Due To Accidents.

आणखी एका सरकारी कंपनीची विक्री:केंद्राने 211 कोटींना विकली पवनहंस हेलिकॉप्टर कंपनी, अपघातांमुळे नेहमीच होती चर्चेत

17 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

देशातील अनेक हेलिकॉप्टर अपघातांसाठी कुप्रसिद्ध असलेली पवनहंस ही एकमेव सरकारी हेलिकॉप्टर सेवा देणारी कंपनी आता विकल्या गेली आहे. केंद्र सरकारने पवनहंस लिमिटेड ही कंपनी स्टार-9 मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला 211.14 कोटी रुपयांना विकली आहे. तेव्हापासून पवनहंस कंपनी सध्या चर्चेचा विषय बनलीआहे.

पवनहंस कंपनी विकण्यामागे सरकारने दिलेले कारण ?

आर्थिक संकटामुळे पवनहंस कंपनी खाजगी लोकांच्या हातात गेली.
आर्थिक संकटामुळे पवनहंस कंपनी खाजगी लोकांच्या हातात गेली.

केंद्र सरकारने पवनहंस लिमिटेडची विक्री करण्याचा निर्णय घेतला आहे. हेलिकॉप्टर कंपनी पवनहंस लिमिटेडच्या विक्रीमागे सरकारचे म्हणणे आहे की कंपनी सातत्याने आर्थिक संकटाचा सामना करत आहे. खालील 3 कारणांसाठी सरकारने पवनहंसला विकल्याचे सांगीतले आहे.

 • तीन दशकांहून अधिक जुन्या असलेल्या या कंपनीला 2018-19 या आर्थिक वर्षात सुमारे 69 कोटी रुपयांचा तोटा झाला होता.
 • यानंतर 2019-20 मध्येही कंपनीला सुमारे 28 कोटींचा तोटा सहन करावा लागला.
 • कॅबिनेट कमिटी ऑफ इकॉनॉमिक अफेअर्सने (CCEA) 3 वेळा ते विकण्याचा प्रयत्न केला, पण त्यावेळी एकाही गुंतवणूकदाराने ते विकत घेण्यात रस दाखवला नाही. यामुळे सरकारने या कंपनीतील हिस्सा विकण्याचा निर्णय घेतला आहे.

पवनहंस कंपनीवर आहे 230 कोटी रुपयांचे कर्ज

पवनहंसची विक्री करण्यापूर्वी सरकारने कंपनीला तोट्यातून सावरण्याची योजनाही आखली होती. पवनहंस हेलिकॉप्टरची संख्या वाढवून सेवेत सुधारणा करण्याची सरकारची इच्छा होती, पण त्यात सरकारला अपयश आले. हेलिकॉप्टर सेवा देण्यासोबतच ही कंपनी प्रशिक्षण आणि कौशल्य विकास आणि व्यवसाय विकास यांसारखे कार्यक्रमही चालवते.

2018 मध्ये झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा आणि 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी हेलिकॉप्टर बुक केले होते, परंतु येथेही कंपनी व्यवस्थापनाच्या अपयशामुळे आर्थिक नुकसानाची भरपाई करण्यात निराशाच झाली आणि खासगी कंपन्यांचा विजय झाला. तसेच या कंपनीवर सध्या 230 कोटी रुपयांचे कर्ज आहे.

खरेदी करणाऱ्या कंपनीचा इतिहास

द प्रिंटच्या वृत्तानुसार, सरकारने पवनहंस लिमिटेड ही कंपनी स्टार-9 मोबिलिटी कंपनीकडे सोपवली आहे. जाणून घेवू या स्टार-9 मोबिलिटी कंपनीशी संबंधित या 4 खास गोष्टी...

 • स्टार-9 मोबिलिटी कंपनीची स्थापना केवळ सहा महिन्यांपूर्वीच झाली होती. ही कंपनी 29 ऑक्टोबर 2021 रोजी मुंबईत नोंदणीकृत झाली.
 • स्टार-9 मोबिलिटी कंपनीने केवळ 11 कोटी रुपये जास्त देऊन पवनहंस लिमिटेडला विकत घेतले.
 • स्टार-९ मोबिलिटी ही बिग चार्टर प्रायव्हेट लिमिटेड, महाराजा एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि अल्मास ग्लोबल अपॉर्च्युनिटी फंड एसपीसी यांचा समावेश असलेली कंपनी आहे.
 • सरकारला त्याच्या 51 टक्के हिस्सेदारीसाठी किमान 500 कोटी रुपये मिळतील अशी अपेक्षा होती, परंतु सरकारने विक्रीची मूळ किंमत केवळ 199.92 कोटी रुपये ठेवली.

हेलिकॉप्टर दुर्घटनेसाठी पवनहंसची ख्याती

सुरक्षेच्या दृष्टिकोनातून पवनहंस हेलिकॉप्टरचा रेकॉर्ड हा चांगला नव्हता. तब्बल साडेतीन दशके देशाची सेवा करणारे हे पवनहंस हेलिकॉप्टर हे त्याच्या सेवेपेक्षा अपघातामुळेच जास्त बदनाम झाले. पवनहंस लिमिटेड कंपनीने त्यांच्या वेबसाइटवर सुरक्षेचे त्यांच्या फ्लाइट ऑपरेशन्सचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वर्णन केले आहे. मात्र, सुरुवातीपासूनच इंजिनमधील समस्या, ऑइल लीकेज, सेन्सरच्या समस्या अशा अनेक समस्यांना ही कंपनी तोंड देत होती.

पवनहंस हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झालेल्याची संख्या किती?

आतापर्यंत या हेलिकॉप्टरशी संबंधित 20 अपघात झाले असून, यामध्ये 91 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या लोकांमध्ये 60 प्रवासी, 27 पायलट आणि 4 क्रू मेंबर्सचा समावेश आहे.

पवनहंस हेलिकॉप्टरच्या झालेले मोठे अपघात, ज्यामध्ये कोणीही वाचलेले नाही.

 • 2010 ते 2012 या कालावधीत 12 हेलिकॉप्टर अपघात झाले, त्यापैकी 10 अपघात हे पवनहंस हेलिकॉप्टरचे होते. या अपघातांमध्ये 55 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.
 • जुलै 1988 मध्ये पवनहंस हेलिकॉप्टर अपघाताचा पहिला बळी गेला होता. जम्मू-काश्मीरमधील वैष्णोदेवी येथे झालेल्या या अपघातात दोन वैमानिकांसह सात जणांचा मृत्यू झाला होता.
 • 2011 मध्ये पवनहंस हेलिकॉप्टरच्या अपघातात 31 जणांचा मृत्यू झाला होता. यामध्ये अरुणाचल प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री दोर्जी खांडू यांच्याही दुःखद मृत्यूचा समावेश आहे. 30 एप्रिल 2011 रोजी, CM खांडू हे पवनहंसच्या AS-B350-B3 हेलिकॉप्टरमध्ये चार जणांसह प्रवास करत होते. हेलिकॉप्टर कोसळले तेव्हा या अपघातात खांडूसह 5 ही जणांचा मृत्यू झाला होता.
 • 13 जानेवारी 2018 रोजीही पवन हंस हेलिकॉप्टर मुंबईतील जुहू विमानतळावरून उड्डाण घेतल्यानंतर लगेचच बेपत्ता झाले होते. ONGC च्या अधिकाऱ्यांसह पाच जण हेलिकॉप्टरमध्ये होते. या अपघातातही सर्व लोकांचा मृत्यू झाला.

तथापि, पवनहंसच्या या अपघातांबाबत, DGCA यांनी हेलिकॉप्टर अपघातांमागे आवश्यक देखभाल नसणे, सुरक्षा मानकांचे पालन न करणे अशी काही कारणे असल्याचे म्हटले होते.

पवनहंस कंपनीचा हतिहास

 • ही कंपनी ऑक्टोबर 1985 मध्ये सुरू झाली. 6 ऑक्टोबर 1986 रोजी पवनहंस यांनी ONGC साठी पहिले व्यावसायिक ऑपरेशन सुरू केले. त्याचे पहिले व्यावसायिक उड्डाण जुहू विमानतळ, मुंबई येथून केवळ 2 हेलिकॉप्टरने ऑफशोअर रिग्सपर्यंत सुरू झाले.
 • त्याच्या ताफ्यात सध्या सुमारे 41 हेलिकॉप्टर आहेत. पवनहंस लिमिटेडची स्थापना झाली तेव्हा भारतीय कंपन्या हेलिकॉप्टर चालवत नव्हत्या. त्यावेळी भारतात हेलिकॉप्टर सेवा फारच मर्यादित होती आणि त्यातील तज्ञ मंडळीही कमी होती.
 • पवनहंस हे देशातील एकमेव सरकारी हेलिकॉप्टर सेवा देणारी कंपनी आहे. हे पूर्णपणे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाच्या अंतर्गत काम करते.
 • पवनहंस लिमिटेडमध्ये केंद्राकडे 51% आणि ONGC ची 49% हिस्सेदारी आहे.
 • ONGC ला सेवा पुरवण्यासोबतच ही कंपनी अनेक राज्य सरकारांना सेवा पुरवते.
 • सध्या पवनहंस लिमिटेडचे ​​MD आणि CEO संजीव राजदान आहेत. ते पवनहंस लिमिटेडमध्ये 2007 मध्ये डेप्युटी जनरल मॅनेजर म्हणून रुजू झाले.

पवनहंसची वैशिष्ट्ये

पवनहंस हेलिकॉप्टर सर्वसामान्य लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सेवा देतो
पवनहंस हेलिकॉप्टर सर्वसामान्य लोकांना धार्मिक स्थळांना भेटी देण्यासाठी सेवा देतो

पवनहंस हेलिकॉप्टर अपघातांसाठी ओळखले जात असले तरी या हेलिकॉप्टर कंपनीचीही काही महत्वाची वैशिष्टयेपण आहेत.

 • ही आशियातील सर्वात मोठी हेलिकॉप्टर कंपनी आहे, जी आपल्या ग्राहकांना वेगवेगळ्या प्रकारे सेवा देते.
 • हे हेलिकॉप्टर विशेषतः कठीण भूभागावर उड्डाण करतात.
 • याशिवाय वैष्णो देवी, बद्रीनाथ, केदारनाथ या धार्मिक स्थळांना भेट देण्यासाठी सर्वसामान्यांना सेवाही देत ​​आहे.
 • ही कंपनी ईशान्येकडील राज्यांतील सरकारी कामांमध्ये सुद्धा ही कंपनी हेलिकॉप्टर सेवा पुरवते.

पवनहंसच्या व्यतिरिक्त सेवा देणारी इतर हेलिकॉप्टर कोणते ? काय आहे त्यांची वैशिष्टये

पवनहंस हेलिकॉप्टरमुळे देशात अनेक अपघात झाले आहेत, मात्र पवनहंसप्रमाणेच केंद्र सरकारकडेही इतर अनेक प्रकारचे हेलिकॉप्टर आहेत. हे सर्व हेलिकॉप्टर त्यांच्या मोडस ऑपरेंडीनुसार काम करतात. त्यांची जबाबदारीही देशाच्या संरक्षण मंत्रालयावर आहे. यामध्ये प्रामुख्याने चिनूक आणि Mi-17V-5 सारख्या हेलिकॉप्टरचा समावेश आहे.

चिनूक हेलिकॉप्टर - चिनूक हे एक खास हेलिकॉप्टर आहे, ज्याचा उपयोग लष्कराचे जवान आणि सामान आणण्यासाठी आणि नेण्यासाठी केला जातो. कोणत्याही आपत्तीच्या वेळी मदत आणि बचाव कार्यात ती महत्त्वाची भूमिका बजावते. नुकतेच चिनूक हेलिकॉप्टरने सर्वात लांब नॉन-स्टॉप उड्डाणाचा विक्रम केला आहे. एकावेळी 11 टन माल आणि 45 सशस्त्र सैनिकांना वाहून नेण्यास चिनूक सक्षम आहे.

Mi-17V-5 हेलिकॉप्टर - Mi-17V-5 हे जगातील सर्वात प्रगत वाहतूक हेलिकॉप्टर आहे. हे सैन्य आणि शस्त्रे वाहतूक, फायर सपोर्ट, पेट्रोंलिंग सुरक्षेसाठी आणि शोध आणि बचाव (SAR) मोहिमांमध्ये देखील वापरले जाऊ शकते. याचा वापर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यक्रमांमध्ये, म्हणजे VVIP ते लष्कराच्या अनेक ऑपरेशनमध्ये केला जातो. जगातील सुमारे 60 देश 12 हजारांहून अधिक MI-17 हेलिकॉप्टर वापरतात. अलीकडेच, देशातील पहिले CDS बिपिन रावत यांच्या निधनामुळे MI-17 हे हेलिकॉप्टर खूप चर्चेत आले होते. रावत हे याच हेलिकॉप्टरमध्ये होते आणि 8 डिसेंबर रोजी हेलिकॉप्टर अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

पवनहंस यांच्या ताफ्यातील हेलिकॉप्टर्स

पवनहंसच्या विक्रीवर काँग्रेसने उपस्थित केले 3 प्रश्न

काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ पंत यांनीही पवनहंसच्या विक्रीबाबत 3 प्रश्न उपस्थित केले आहेत. या संपूर्ण प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांनी म्हटले आहे की…

 • पवनहंस यांना विकत घेतलेल्या कंपनीची स्थापना 6 महिन्यांपूर्वी झाली होती. अशा स्थितीत सरकारने अशा नव्या कंपनीला आपल्या सार्वजनिक क्षेत्रातील हेलिकॉप्टर कंपनीला केवळ 211 कोटी रुपयांना देण्याचा निर्णय का घेतला?
 • ही कंपनी घेण्यासाठी तीन कंपन्या बोली लावण्यासाठी येतात, त्यापैकी दोन राखीव किंमतीपेक्षा कमी बोली लावतात आणि त्यातील एक कंपनी ही राखीव किंमतीपेक्षा केवळ 11 कोटी रुपये जास्त बोली लावतात आणि तरीही सरकार त्या कंपनीला ही कंपनी सोपवत आहे?
 • पवनहंसमध्ये भारत सरकारचा 51% हिस्सा आहे. ONGC कडे 49% स्टेक आहे आणि ONGC ला पवनहंस कंपनी विकत घ्यायची आहे. अशा स्थितीत सरकारने उर्वरित भागभांडवल ओएनजीसीला न देता केवळ सहा महिने जुन्या कंपनीला का दिले?

काँग्रेसचे प्रवक्ते म्हणाले, 'पवन हंस कंपनीच्या कर्मचारी संघटनेनेही ही कंपनी खरेदी करण्याचा प्रस्ताव सरकारला पाठवला होता. मात्र, भारत सरकारने त्यांच्या युनियनला सांगितले की, तुम्ही यासाठी पात्र नाही, 6 महिने जुनी असलेली ही कंपनी पात्र आहे, तुम्हाला यातील काहीच माहिती नाही. त्यामुळे अशा परिस्थितीत विरोधी पक्षनेत्यांनी सरकारच्याच हेतूवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

बातम्या आणखी आहेत...