आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआॅस्ट्रेलियात भारतीयांची लाेकसंख्या आहे. आॅस्ट्रेलियन सांख्यिकी विभागाकडून हा दावा करण्यात आला आहे. २०१६ नंतर भारतीयवंशाच्या समुदायाची संख्या ४८ टक्क्यांनी वाढली आहे. ताज्या जनगणनेनुसार २०२१ मध्ये १ जून रोजी देशात ६ लाख ७३ हजार ३५२ लाेक वास्तव्याला असल्याचे स्पष्ट झाले. २०१६ मध्ये ही संख्या ४ लाख ५५ हजार ३८९ एवढी हाेती. .
अर्थात हा टक्का ४७.८६ एवढा जास्त हाेता. त्यात भारतवंशीयांची संख्या सर्वाधिक वाढली आहे. आॅस्ट्रेलियात भारताने चीन व न्यूझीलंडला देखील पिछाडीवर टाकले. आॅस्ट्रेलिया, इंग्लंडनंतर भारत तिसऱ्या स्थानी आहे. माता-पित्यापैकी एक परदेशात जन्माला आलेले नागरिक आॅस्ट्रेलियात जास्त आहे. देशात अर्धी (४८.६ टक्के) लाेकसंख्या अशा प्रकारची आहे. २०१७ च्या जनगणनेनंतर दहा लाखांहून जास्त नागरिक आॅस्ट्रेलियात स्थलांतरित झाले आहेत. त्यातही भारतातून आॅस्ट्रेलियात आलेल्या लाेकांची संख्या जास्त आहे. भारतीय समुदाय २ लाख १७ हजार ९६३ एवढ्या लाेकसंख्येचा झाला आहे. दुसऱ्या क्रमांकावर नेपाळवंशीय समुदाय आहे. त्यांचे प्रमाण दुपटीहून जास्त (१२३.७ टक्के) आहे. २०१६ नंतर ६७ हजार ७५२ नेपाळी आॅस्ट्रेलियात वास्तव्याला आले आहेत. पहिल्यांदाच निम्म्याहून कमी नागरिकांनी स्वत:ची आेळख ख्रिश्चन अशी सांगितली. ५० वर्षांपूर्वी देशात ख्रिश्चन समुदाय ९० टक्के हाेता. अजूनही आॅस्ट्रेलियात ख्रिश्चन धर्म सर्वात माेठा मानला जाताे. पाच धर्मांमध्ये हिंदूंचे प्रमाण २.७ टक्के आहे. ३९ टक्के लाेक काेणत्याही धर्माला मानत नाहीत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.