आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निष्काळजीपणा:कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या तुलनेत दैनंदिन चाचण्या आता निम्म्यांवर, नवीन संकटाची भीती

नवी दिल्ली / पवन कुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

२९ ऑक्टोबरनंतर देशात दररोज वाढणारे कोरोनाचे नवीन आकडे १३ हजारांचा आकडा गाठू शकलेले नाहीत. त्यामुळे कोरोना संपला आहे असे वाटते. पण या गैरसमजातून केलेला निष्काळजीपणा भारी पडू शकतो. एक वस्तुस्थिती अशी आहे की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात म्हणजेच एप्रिल-मेमध्ये रोज होत असलेल्या चाचण्यांपैकी निम्म्याच होत आहेत. एप्रिलमध्ये रोज सरासरी १८ लाख, मे महिन्यात १९.५ लाख, तर जूनमध्ये रोज सरासरी १९ लाख चाचण्या घेतल्या जात होत्या. तर ३१ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान कोणत्याही दिवशी चाचण्यांची संख्या ११ लाखांपर्यंत पोहोचली नाही. दुसरी चिंतेची बाब अशी की, जगभरात चाचणीचे सुवर्ण मानक मानल्या जाणाऱ्या आरटीपीसीआर चाचण्यांची टक्केवारी देशात कमी होत आहे. एप्रिल ते जून दरम्यान, आरटीपीसीआर ७०% व रॅपिड चाचण्या ३०% होत होत्या. परंतु २९ ऑक्टोबर ते ४ नोव्हेंबरपर्यंतच्या सरकारी आकडेवारीवरून असे दिसते की, एकूण तपासण्यांमधील आरटीपीसीआरचा वाटा आता ८ टक्क्यांनी कमी होऊन ६२% वर आला आहे.

...या ३ राज्यांच्या उदाहरणांवरून समजून घेता येईल आरटीपीसीआरचा परिणाम
केरळ
: एकमेव राज्य ज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये आरटीपीसीआर अधिक आहे. कोणत्याही जिल्ह्यात हे प्रमाण ६५% पेक्षा कमी नाही. ९ जिल्ह्यांत पॉझिटिव्हिटी दर १०% हून अधिक तर ५ जिल्ह्यांत ५% हून अधिक आहे.

आसाम : कार्बी आंगलाँग वगळता सर्व जिल्ह्यात अँटीजनचे प्रमाण ५५% हून अधिक आहे. आसामातील १ जिल्ह्यात पॉझिटिव्हिटी दर १०% हून अधिक व १ जिल्ह्यात ५% हून अधिक आहे. तर अन्य ३१ जिल्ह्यांत ५% पेक्षा कमी आहे.

बिहार : ३८ जिल्ह्यांपैकी एकाही जिल्ह्यात टेस्ट पॉझिटिव्हिटी दर ५% पेक्षा जास्त नाही. केवळ १० जिल्ह्यातच आरटीपीसीआरचे प्रमाण ५०% वा त्याहून अधिक आहे. अन्य २८ मध्ये रॅपिड टेस्ट अधिक केल्या जाताहेत.

येथे आरटीपीसीआर कमी
- 691 जिल्ह्यांमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट ५% पेक्षा कमी आहे. यापैकी २९८ जिल्हे असे आहेत जेथे रॅपिड अँटीजनचे प्रमाण ५०% वा त्याहून अधिक आहे.
- 79 जिल्ह्यांमधेय अँटीजनचे प्रमाण ४०% वा त्याहून अधिक आहे. म्हणजेच ५४.५% जिल्हे मुख्यत्वे रॅपिड अँटीजन टेस्टवरच निर्भर आहेत.

येथे आरटीपीसीआर अधिक
- 18 जिल्ह्यांमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट १०% हून अधिक आहे. यात ११ जिल्हे असे आहेत जेथे आरटी-पीसीआरचे प्रमाण ५०% पेक्षा जास्त आहे.
- उर्वरित 8 जिल्ह्यांत आरटीपीसीआर चे प्रमाण ४०% सुद्धा नाही. म्हणजेच ६१.१% जिल्हे मुख्यत्वे आरटीपीसीआर चाचण्यावरच निर्भर आहेत.

‘आयसीएमआर’च्या प्रोटोकॉलनुसार आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटीजन टेस्ट या दोन्हीपैकी कोणत्याही टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांची नोंद घेणे आवश्यक आहे. परंतु धक्कादायक वास्तव असे आहे की, जेथे आरटीपीसीआर चाचण्या जास्त होताहेत तेथे पॉझिटिव्हिटी दर जास्त आहे. ही बाब अशी समजून घेता येईल...

कॉन्टॅक्ट ट्रेसिंग बंद
प्रोटोकॉल आहे : पॉझिटिव्ह व्यक्तिंच्या संपर्कात आलेल्या लोकांची अँटीजन टेस्ट करावी. लक्षणे आढळल्यास आणि अहवाल निगेटिव्ह असल्यास आरटीपीसीआर करा. परंतु, सध्या बहुतांश राज्यांमध्ये स्वत: केंद्रावर येणाऱ्यांचीच चाचणी होत आहे.

बातम्या आणखी आहेत...