आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Competition Commission To Investigate Google; Google Is Not Paying The Right Amount For Content | Marathi News

कारवाई:स्पर्धा आयोग करणार गुगलची चौकशी; आयएनएसच्या तक्रारीवर कारवाई, कंटेटसाठी योग्य रक्कम देत नाही गुगल

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

गुगलविरोधात वृत्तपत्र प्रकाशकांच्या तक्रारींवर भारतीय स्पर्धा आयोगाने (सीसीआय) चौकशीचे आदेश दिले आहेत. गुगल एकाधिकाराचा वापर करत प्रकाशकांना सामग्रीच्या वापराबाबत योग्य रक्कम देत नाही, हा आरोप आहे. आयएनएसच्या तक्रारीवरून गुगलची चौकशी होईल.

तक्रारीत म्हटले होते की, गुगलची पितृक कंपनी अल्फाबेट इंक, गुगल एलएलसी, गुगल इंडियासह इतर युनिट भारतातील ऑनलाइन न्यूज मीडिया बाजारात न्यूज रेफरल सर्व्हिस व गुगल अॅड टेक सर्व्हिसेसमध्ये दबदब्याचा लाभ घेत आहे. डिजिटल माध्यमांद्वारे उपलब्ध वृत्तांसाठी प्रोड्युसर किंवा प्रकाशनांना त्या कंटेंटच्या वापराच्या बदल्यात योग्य मोबदला दिला जात नाही. ऑस्ट्रेलिया, स्पेन आणि फ्रान्ससह अनेक देशांनी असे कायदे केलेत की त्याअंतर्गत गुगलसह सर्व टेक्नॉलॉजी कंपन्यांना सर्चद्वारे मिळणारे कंटेंटसाठी प्रकाशकांना योग्य रक्कम द्यावीच लागेल. युरोपियन पब्लिशर्स काैन्सिलनेही गुगलविरोधात तक्रार केली आहे. आयएनएसच्या मते गुगल जाहिरात महसूल शेअर करण्यासंदर्भात मीडिया संस्थांना अंधारात ठेवते. सीसीआयने युक्तिवादांचे परीक्षण केल्यानंतर त्या तक्रारी स्पर्धा कायदा २००२ अंतर्गत असल्याचे आढळले आहे. आयाेगाने आयएनएसची तक्रार डिजिटल न्यूज पब्लिशर्सच्या अशा तक्रारीशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. आयएनएस आपले सदस्य व वृत्तपत्र प्रकाशकांना त्यांच्या कंटेंटसाठी गुगलकडून योग्य रक्कम देण्यासाठी व पारदर्शकतेसाठी काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...