आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Complaint Filed Against Twitter India MD Manish Maheshwari For Spreading Communal Hatred;news And Live Updates

ट्विटरविरूद्ध पाचवा खटला:हिंदू देवीचा अपमान केल्याबद्दल ट्विटरच्या एमडीविरोधात सायबर सेलमध्ये तक्रार, भावना दुखावल्याचा आरोप

नवी दिल्लीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल केले होते ब्लॉक

ट्विटरच्या अडचणीत द‍िवसेंदिवस वाढ होताना द‍िसत आहे. आधीच केंद्र सरकार आण‍ि ट्विटरमध्ये नवीन आयटी न‍ियमांवरुन गेल्या काही द‍िवसांपासून वाद सुरु आहे. आता द‍िल्लीतील एका वकीलाने ट्विटरच्या एमडीविरोधात हिंदू देवीचा अपमान केल्याप्रकरणी सायबर सेलकडे तक्रार दाखल केली आहे. ट्व‍िटरवर ही पाचवी तक्रार असून या तक्रारीमध्ये ट्विटरचे एमडी मनीष माहेश्वरी आणि ट्विटर हॅंडल एथिस्ट रिपब्लिकवर देवी कालीबद्दल आक्षेपार्ह सामग्री पोस्ट केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एथिस्ट रिपब्लिकने आपल्या ट्विटर हँडलवर काही टी-शर्टची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. यातील एका टी-शर्टमध्ये देवी कालीचा फोटो आहे. तक्रारकर्त्याने हा फोटो आक्षेपार्ह मानून त्याव‍िरोधात तक्रार दाखल केली आहे.

ट्विटरवर आतापर्यंत 5 तक्रार दाखल
1. मुस्लिम वृद्धाला मारहाण प्रकरणात गाझियाबाद पोलिसांनी ट्विटरवर एफआयआर नोंदविला होता.
2. देशाचा चुकीचा नकाशा दाखविल्याप्रकरणी बुलंद शहरात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
3. मध्य प्रदेशच्या सायबर सेलमध्ये देशाचा नकाशा चुकीच्या पद्धतीने दाखवल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
4. चाईल्ड पोर्नोग्राफिक कंटेट प्रकरणी दिल्ली पोलिसांच्या सायबर सेलने गुन्हा दाखल केला होता.
5. हिंदू देवीचा अपमान केल्याबद्दल द‍िल्ली पोल‍िसांत तक्रार दाखल

रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल केले होते ब्लॉक
ट्विटरने यापूर्वी कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांचे ट्विटर हँडल एक तासासाठी ब्लॉक केले होते. त्यांनी अमेरिकेच्या डिजिटल मिलेनियम कॉपीराइट कायद्याचे उल्लंघन केले असल्याचे यामागे कारण असल्याचे सांगण्यात आले होते. परंतु, नंतर ट्विटरने रविशंकर प्रसाद यांना इशारा देत त्यांचे ट्विटर हँडल पुन्हा सुरू केले.

यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना रविशंकर प्रसाद म्हणाले होते की, 'मित्रांनो! आज एक अतिशय विचित्र घटना घडली. ट्विटरने माझे खाते एक तासासाठी ब्लॉक केले. प्रसाद यांनी ही माहिती आधी नेटिव्ह मायक्रोब्लॉगिंग आणि सोशल नेटवर्किंग साइट कु आणि त्यानंतर ट्विटरद्वारे शेअर केली होती.

बातम्या आणखी आहेत...