आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकेंद्र सरकार कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) तंत्रज्ञानाचा वापर आपल्याकडे येणाऱ्या तक्रारींच्या निगराणीसाठी करत आहे. या प्रक्रियेमुळे तक्रारी लटकणे, अडकणे किंवा भरकटवून टाकणाऱ्या अधिकाऱ्यांची आेळख पटू शकेल. त्याशिवाय खोटी तक्रार करणाऱ्यांचीही धरपकड केली जात आहे. सेंट्रलाइज्ड पब्लिक ग्रिव्हास रिड्रेसल अँड मॉनिटरिंग सिस्टिममध्ये सरकारने गेल्या वर्षी डिसेंबरपासून एआयचा वापर सुरू केला आहे. या तंत्रज्ञानामुळे तक्रारींचा निपटारा दुपटीने होत आहे. तक्रारींची सोडवणूक करण्याचा सरासरी कालावधी ३० दिवसांहून घटून १८ दिवसांवर आला आहे.
तक्रारींवर आता ३० ऐवजी १८ दिवसांत तोडगा
42,101 तक्रारी एक महिन्यात
1507 तक्रारी एक वर्षाहून जास्त जुन्या.
4406 तक्रारी सहा महिन्यांपूर्वीच्या
23,114
तक्रारी महिन्याहून जास्त जुन्या.
खोट्या तक्रारींची संख्याही आेळखली
एआयच्या वापरामुळे खोट्या तक्रारी नोंदवणारे अनेक मोबाइल नंबर, ई-मेल आयडीची आेळख पटली आहे. १४ महिन्यादरम्यान ५४ मोबाइल क्रमांकांची आेळख पटली. याद्वारे एक हजारांहून जास्त तक्रारी करण्यात आल्या. त्यापैकी पाच क्रमांकावरून १० हजारांपेक्षा जास्त तक्रारी नोंदवण्यात आल्या.
जास्त विलंबाने काम करणारे विभाग
अणुऊर्जा विभाग 95
ऊर्जा मंत्रालय 74
सीबीडीटी 65
रस्ते-महामार्ग मंत्रालय63
महसूल विभाग 62
युवा मंत्रालय 55
पेयजल मंत्रालय 54
सामाजिक न्याय 46
आयुष मंत्रालय 45
पशुपालन विभाग 43
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.