आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Complete Final Phase 3 Analysis । Bharat Biotech । 77.8% Efficacy । Hyderabad Based Company; News And Live Updates

कोव्हॅक्सिन 78% प्रभावी:भारत बायोटेकने फेज-3 च्या क्लिनिकल चाचण्यांचा अंतिम डेटा केला जाहीर, डेल्टा व्हेरिएंटवरदेखील 65% प्रभावी

हैदराबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डब्ल्यूएचओने ईओआयला दिली होती मान्यता

कोव्हॅक्सिन लसीची निर्माता कंपनी असलेल्या भारत बायोटेकने आपल्या लसीच्या फेज-3 च्या क्लिनिकल चाचण्यांचा अंतिम डेटा जाहीर केला आहे. त्यानुसार कोव्हॅक्सिन ही लस कोरोनावर 77.8 टक्के प्रभावी असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यासोबतच ही लस कोरोनाच्या नवीन डेल्टा प्लस व्हेरिएंटवरदेखील 65 टक्के प्रभावी असल्याचे सांगितले जात आहे.

भारत बायोटेकच्या म्हणण्यानुसार, ही लस कोरोनाचे गंभीर लक्षणे असलेल्या प्रकरणांमध्ये 93.4 टक्के प्रभावी आहे. तर सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांमध्ये कोव्हॅक्सिन ही 63.6% प्रभावी आहे. त्यासोबतच जगभरात चिंताजनक बनत चाललेल्या B.1.617.2 डेल्टा प्लस व्हेरिएंटवर 65 टक्के प्रभावी असल्याचे डेटामधून समोर आले आहे. हा डेटा मेडरेक्झिव्ह प्री प्रिंट सर्व्हरमध्ये प्रकाशित करण्यात आले आहे.

25 हजार लोकांवर चाचणी
कोव्हॅक्सिनची ही चाचणी 25 रुग्णालयांतील 25 हजार लोकांवर करण्यात आली आहे. दरम्यान, ही लस कोरोनापासून संरक्षण देण्यास जास्तच सक्षम असल्याचे दिसून आले आहे. या लसीला भारत बायोटेक आणि इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) यांच्या संयुक्त विद्यमाने तयार करण्यात आले आहे. सूंत्राच्या माहितीनुसार, या लसीला डीजीसीआयकडून आज मान्यता मिळू शकते.

डब्ल्यूएचओने ईओआयला दिली होती मान्यता
भारत बायोटेकच्या एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्टला (EOI) जागतिक आरोग्य संघटनेने यापूर्वी स्विकारले होते. कोव्हॅक्सिन लसीला मान्यता मिळवून देण्यासाठी कंपनीने 19 एप्रिल रोजी ईओआय सादर केले होते.

बातम्या आणखी आहेत...