आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Conducting Fitji Talent Reward Exam 2022 On 25th December In Various Cities Of The Country

22 डिसेंबरपर्यंत नोंदणी करावी:देशाच्या विविध शहरांत 25 डिसेंबरला फिटजी टॅलेंट रिवॉर्ड परीक्षा-2022 चे आयोजन

नवी दिल्ली13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेईई मेन्स, अॅडव्हान्स या दोन्ही यश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी फिटजी टॅलेंट रिवाॅर्ड परीक्षा (एफटीआरई) यंदा २५ डिसेंबरला होणार आहे. देशातील बहुप्रतीक्षित परीक्षांपैकी असलेल्या या परीक्षेत इयत्ता पाचवीपासून अकरावीपर्यंत आणि २०२३ मध्ये जेईई अॅडव्हान्समध्ये सहभागी होणारे विद्यार्थी सहभागी होऊ शकतात. त्यासाठी नोंदणी करण्याची शेवटची तारीख २२ डिसेंबरपर्यंत आहे. ही परीक्षा ऑफलाइन, ऑनलाइन दोन्ही मोडमध्ये होणार आहे. या परीक्षेद्वारे विद्यार्थी स्वत: मूल्यांकन करू शकतो.

चांगली श्रेणी मिळवणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थिनींना फिटजी क्लासरुम प्रोग्राममधून सूट दिली जाईल. त्यात ३०० कोटी रुपयांपर्यंतच्या रोख शिष्यवृत्तीचा देखील समावेश आहे. उत्तीर्ण विद्यार्थी किंवा विद्यार्थिनींसाठी १० कोटी रुपयांपर्यंतच्या वसतिगृह शुल्काचाही समावेश आहे. मुलींसाठी इतर सवलतीही असतील. विद्यार्थ्यांना त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवण्यासाठी काय करावे लागते, याची फिटजीला चांगली कल्पना आहे. फिटजीचा निकाल हा त्याचा पुरावा ठरतो. जेईई अॅडव्हान्स २०२२ मध्ये अव्वल ५० पैकी १५ तर राष्ट्रीय क्रमवारीत अव्वल १०० मध्ये फिटजी क्लासरुम प्रोग्रॅमचे २९ विद्यार्थी आहेत. फिटजी समूहाचे संचालक आर.एल. त्रिखा म्हणाले, फिटजी टॅलेंट रिवॉर्ड परीक्षेच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना एक व्यापक रिपोर्ट मिळू शकतो. एवढेच नव्हे तर टक्केवारीनुसार गुणपत्रकही दिले जाईल. एफटीआरई सर्वात मोठा आणि सर्वात महत्त्वाचा मंच आहे. कला, वाणिज्य किंवा चिकित्सा यापैकी पर्याय निवडणारे विद्यार्थीही या परीक्षेत सहभागी होऊन लाभ घेऊ शकतात.

ऑनलाइन, मोबाइलनेही नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध ऑनलाइन नोंदणी www.fiitjee-ftre.com या माध्यमातून होऊ शकते. मोबाइलने नोंदणीसाठी www.fiitjee-ftre.com/mobile याला भेट द्या. त्यामुळे नोंदणी अर्ज भरून एका युनिक आयडीसोबत (आधार कार्ड,जन्माचा दाखला) यासह सर्व कागदपत्रे फिटजी केंद्रात जमा करून नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली जाऊ शकते. नोंदणी शुल्क ५०० रुपये आहे. अधिक माहितीसाठी जवळच्या फिटजी केंद्राला भेट द्यावी अथवा /www.fiitjee-ftre.com यावर लॉगइन करता येऊ शकते.

बातम्या आणखी आहेत...