आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वात्सल्य:जवानाची गंभीर आजाराशी झुंज;  भेटीसाठी आईने गाठला 2500 किमीचा पल्ला!

जोधपूरएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • केरळातून परतला जवान; डाॅक्टर म्हणाले-आईच्या भेटीने प्रकृती स्थिर हाेणार
  • एम्समध्ये सुरू आहेत उपचार; लाॅकडाऊनमध्येही आईला भेटीसाठी पाेलिसांची परवानगी

काेराेनाच्या महामारीमुळे देशभरात लाॅकडाऊन करण्यात आला. सर्वच राज्यांच्या सीमा बंद असल्याने प्रवास करता येऊ शकत नाही. अशाच परिस्थितीमध्ये देशाच्या पश्चिम सीमारेषेवर तैनात असलेल्या सीमा सुरक्षा दलाच्या एका जवानाची प्रकृती अचानक खालावली. गंभीर आजाराची बाधा झाल्याने त्याला तत्काळ जाेधपुरातील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. याच ठिकाणी त्याच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र, गंभीर आजारामुळे उपचार घेत असलेल्या या जवानाला आईची आठवण येत हाेती. तिकडे केरळातील आपल्या घरी असलेली आईदेखील मुलाच्या भेटीसाठी व्याकूळ झाली हाेती. अखेर तिने मुलाच्या भेटीसाठी येणाऱ्या सर्वच आव्हानांवर मात केली. पुत्रप्रेमातून या आईने तब्बल २५०० किमीचा पल्ला गाठला आणि मुलाची भेट घेतली. आईच्या भेटीने मुलाची प्रकृती स्थिर हाेऊ शकते, अशी आशा वैद्यकीय तज्ञांनी व्यक्त केली हाेती. आणि असेच झाले. आईच्या भेटीने बीएसएफचा जवान अरुण कुमारची तब्बेत आता चांगली आहे. केरळ येथील काेट्ट्यम येथील जवान अरुण कुमार हा बाॅर्डरवर तैनात आहे. याठिकाणी त्याची प्रकृती अचानक बिघडली. त्यामुळे त्याला जाेधपुरातील एम्स रुग्णालयात दाखल केले. याची माहिती काेट्ट्यम येथे राहत असलेल्या आई शीलअम्मा यांना देण्यात आली. त्यामुळे तातडीने आईने आपल्या सुनेला साेबत घेऊन जाेधपुराकडे रवाना हाेण्याचा निर्णय घेतला. पाेलिसांनी परवानगी दिल्याने त्यांनी २५०० किमीचे अंतर गाठले.

सिंड्राेमचा मांसपेशींवर परिणाम

सिंड्राेमचा माेठा परिणाम व्यक्तीच्या मांसपेशीवर पडत असल्याचे वैद्यकीय तज्ञांचे मत आहे. यामुळे पायाला झिनझिन्या येतात. याचा प्रसार हा शरीरातील विविध भागात पसरत असताे. याच्या वाढत्या प्रसारामुळे व्यक्तीच्या मांसपेशीवर विपरित परिणाम पडताे. यामुळे या मांसपेशींची कार्यपद्धती  बंद हाेते. यामुळे लकव्यासारखा धाेक्याची भीती असते.

बातम्या आणखी आहेत...