आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congres Leader Rahul And Priyanka Gandhi । Asks To PM Modi । Why Sends Our Children' Vaccines To Foreign । Political Poster War; News And Live Updates

लस वादात राहुल गांधींची उडी:ज्या पोस्टरला लावल्यानंतर 25 जणांना अटक झाली, त्याला शेअर करत राहुल म्हणाले - मलाही अटक करा

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही हेच पोस्टर शेअर केले

देशात सध्या कोरोना लसीवरुन पोस्टर वाद सुरु झाला असून या प्रकरण आता राजकीय वळण लागले आहे. दरम्यान, या वादामध्ये काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीदेखील उडी घेतली आहे. त्यांनी रविवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवरुन एक पोस्टर शेअर करत मोदी सरकारवर टोला लगावला आहे. ज्यामध्ये त्यांनी 'मलाही अटक करा' असे लिहित 'मोदीजी, आमच्या मुलांच्या लसी परदेशात का पाठवल्या?' असा पोस्टर शेअर केला आहे.

कारण दिल्ली पोलिसांनी शनिवारी हे पोस्टर लावण्यावरुन 25 जणांना अटक केली आहे. तर दुसरीकडे काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी यांनीही हेच पोस्टर शेअर करत याला आपले प्रोफाइल पिक्चर बनवले आहे.

पंतप्रधान मोदी यांच्या नावे पोस्टर्स चिकटवण्यार्‍या 25 जणांवर दिल्ली पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. पोस्टर्समध्ये लसीकरण मोहिमेचा उल्लेख करुन मोदी यांच्यावर टीका केल्याचे एका अधिकार्‍याने म्हटले आहे. कारण हे पोस्टर्स दिल्लीतील बर्‍याच भागात लावले होते. परंतु, या संबंधिची माहिती दिल्ली पोलिसांनी गुरुवारी समजल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

कोणाच्या सांगण्यावरुन पोस्टर्स लावण्यात आले, तपास सुरु
संबंधित प्रकरणात आलेल्या तक्रारींच्या आधारे कलम 188 (सरकारी अधिकार्‍याने दिलेल्या आदेशाचा किंवा नियमांचे उल्लंघन) आणि आयपीसीच्या इतर कलमांतर्गत एफआयआर नोंदविण्यात आले आहे. यामध्ये दिल्लीतील बर्‍याच जिल्ह्यात मालमत्ता कायद्यांतर्गत शासकीय मालमत्तेचे नुकसान करण्याच्या कलम 3 चा समावेश आहे. त्यामध्ये शिक्षेची तरतूद आणि 5 वर्षांपर्यंत दंड करण्याची तरतूद आहे.

बातम्या आणखी आहेत...