आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अदानी मुद्द्यावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ:मराठवाडा, मुंबईसह काँग्रेसचे देशभरात LIC, SBI कार्यालयांबाहेर आंदोलन

नवी दिल्ली2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अदानी समूहावरील हिंडेनबर्गच्या अहवालप्रकरणी संसदेच्या दोन्ही सभागृहांत सोमवारी गदारोळ झाला. यावर चर्चा करण्याच्या मागणीवर विरोधक अडून बसले. काँग्रेसने एलआयसी व एसबीआयच्या कार्यालयांबाहेर अदानी प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समिती (जेपीसी) किंवा सुप्रीम कोर्टाच्या समितीमार्फत करण्याच्या मागणीसाठी देशभरात आंदोलन केले. संसदेतील गदारोळात दोन्ही सभागृहांची कार्यवाही मंगळवारी सकाळी ११ वाजेपर्यंत स्थगित करण्यात आली. दरम्यान, काँग्रेसचे खासदार राहुल गांधी म्हणाले, सरकारची अदानी मुद्द्यावर संसदेत चर्चेची इच्छा नाही. सरकार घाबरलेले आहे. तिकडे सुप्रीम कोर्टात नवी याचिका दाखल करत निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्वात अदानी समूहावरील हिंडेनबर्ग अहवालाच्या चौकशीची मागणी करण्यात आली आहे.

संसदेतील कोंडी आज सुटण्याची शक्यता
मंगळवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू होण्याची शक्यता आहे. सोमवारी संसदीय कार्यसमितीच्या बैठकीत त्यावर सहमती झाली. या कामकाज रोखण्याचे मुद्द्यावर विरोधक चर्चेची मागणी करू शकतात. आभार प्रस्तावावरील चर्चेनंतर सहमती बनवली जाईल, असे सरकारच्या वतीने सांगण्यात आले आहे.

शेअर्समध्ये घसरण सुरूच, सोमवारी ५ टक्क्यांनी घसरले
अदानी समूहाचे शेअर्स घसरणे सुरूच आहे. हिंडेनबर्गचा २४ जानेवारीला अहवाल आल्यानंतर अदानी समूहाची फ्लॅगशिप कंपनी अदानी एंटरप्रायझेसचे शेअर सुमारे ५५ टक्के घसरले आहेत. कंपनीच्या शेअर्समध्ये सोमवारी सकाळी ५ टक्क्यांची घसरण झाली. तथापि, नंतर त्यात वाढ दिसली आणि ते केवळ २ टक्के घसरून १५५४ रुपयांवर बंद झाले. दुसरीकडे ब्रिटिश लेंडर स्टँडर्ड चार्टर्ड बँकेने मार्जिन लोनवर कोलॅटरल म्हणून अदानी समूहाचा बाँड घेणे बंद केले आहे. सिटी ग्रुप आणि क्रेडिट स्विस बँकेनेही असे केले आहे.

बातम्या आणखी आहेत...