आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress 'Bharat Jodo Yatra' Starts From 2nd October, Preparation Of Senior Leaders Begins, Participation In The Meeting

नवी दिल्ली:काँग्रेसची ‘भारत जोडो यात्रा’ 2 ऑक्टोबरपासून सुरू , वरिष्ठ नेत्यांची तयारीला सुरुवात, बैठकीत सहभाग

नवी दिल्लीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसने २ ऑक्टोबरपासून ‘भारत जोडो यात्रा’ काढण्याचे ठरवले आहे. यात्रेच्या तयारीसाठी झालेल्या पहिल्या बैठकीला काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांचीही उपस्थिती होती. उदयपूर येथील नवसंकल्प शिबिरात यात्रा काढण्याचा निर्णय झाला होता.ही यात्रा कन्याकुमारीपासून सुरू होणार आहे. रविवारी यात्रेच्या पूर्वतयारीसाठी बैठक बोलावण्यात आली होती, अशी माहिती वरिष्ठ नेते दिग्विजय सिंह यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली. यात्रेसाठी एका गटाची स्थापना केली जाणार आहे. त्याच्या समन्वयक पदाची जबाबदारी दिग्विजय सिंह यांच्याकडे आहे. ‘भारत जोडो यात्रा’ देशाची एकजूट साधणारी आहे. रविवारी झालेल्या बैठकीत जयराम रमेश, शशी थरूर, ज्योती मणी, बी. व्ही. श्रीनिवास, महिला काँग्रेस प्रमुख एन. डिसुझा, एनएसयूआयचे अध्यक्ष नीरज कुंदन यांची उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...