आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसचे भारत जोडो अभियान:कन्याकुमारीहून 7 सप्टेंबरला सुरू होणार काँग्रेसची भारत जोडो यात्रा

नवी दिल्ली3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

काँग्रेसचे भारत जोडो यात्रा ७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. मंगळवारी पक्षाच्या वतीने ‘भारत जोडो यात्रे’चे बोधचिन्ह, टॅगलाइन व संकेतस्थळ सुरू करण्यात आले. काँग्रेस नेते जयराम रमेश व दिग्विजय सिंह यांनी ही घोषणा केली. जयराम रमेश म्हणाले, देशात आर्थिक असमानता वाढत आहे. सामाजिक ध्रुवीकरण, राजकीय विभाजन वाढत आहे. त्यामुळे राष्ट्रहिताच्या दृष्टीने ही यात्रा महत्त्वाची ठरते.

या अभियानातून तळागाळात पुन्हा काँग्रेसचे समर्थक वाढतील. जनसंपर्क वाढेल असे काँग्रेसला वाटते. ७ सप्टेंबरला कन्याकुमारीतून यात्रेला सुरूवात होईल. ५ महिन्यांत ३ हजार ५७० किलोमीटर अंतर पार करून काश्मीरमध्ये दाखल होईल. यात्रा १२ राज्ये व दोन केंद्रशासित प्रदेशातून जाईल.

बातम्या आणखी आहेत...