आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Congress Chintan Shivir Posters: Gandhi Family Vs Subhash Chandra Bose, Bhagat Singh, And Sardar Patel | Marathi News

काँग्रेसच्या चिंतन शिबिरातील 8 चकित करणारे पोस्टर्स:गांधी घराण्यापेक्षा जास्त महत्त्व सुभाषचंद्र बोस, भगतसिंग आणि सरदार पटेलांना

जयपुर/उदयपुर | समीर शर्मा11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उदयपूरमधील काँग्रेसच्या चिंतन शिबिरात यावेळी लावण्यात आलेली पोस्टर्स काही खास आहेत. सामान्यतः काँग्रेसच्या शिबिरांच्या किंवा अधिवेशनांच्या पोस्टरमध्ये महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू यांच्यासह गांधी घराण्याला किंवा संबंधित राज्याचे मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष यांना महत्त्व दिले जाते.

यावेळी रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू, मनमोहन सिंग यांच्यासह स्वातंत्र्यसैनिकांनाही समान महत्त्व देण्यात आले आहे. पोस्टरमध्ये काँग्रेसचा इनोव्हेशन हा चर्चेचा विषय झालाआहे. मात्र, भाजप याला नेहरू-गांधी घराण्याच्या छायेतून बाहेर पडण्याचा अयशस्वी प्रयत्न म्हणत आहे.

घराणेशाहीच्या आरोपातून बाहेर पडण्यासाठी उपाय
सामान्यतः काँग्रेसच्या कार्यक्रमांमध्ये पोस्टरमध्ये केवळ गांधी कुटुंबीय किंवा मुख्यमंत्री-प्रदेशाध्यक्षांचे चेहरे दिसतात. त्यामुळे काँग्रेसवर अनेकदा घराणेशाहीचे आरोप झाले आहेत. काँग्रेसला पंडित नेहरू, इंदिरा गांधी, सोनिया गांधी आठवतात पण पीव्ही नरसिंह राव, सुभाषचंद्र बोस, लाला लजपत राय आणि स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान विसरल्याचा आरोप भाजपने अनेकदा केला आहे. या पोस्टर्सच्या माध्यमातून काँग्रेसने घराणेशाहीच्या आरोपांना मूकपणे उत्तर देण्याचा प्रयत्न केल्याचे राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. उदयपूर विमानतळापासून ते शहरापर्यंत अनेक ठिकाणी असे पोस्टर्स लावण्यात आले आहेत.

पोस्टरमध्ये कोणासोबत कोण
1
- मनमोहन सिंग यांच्यासोबत पीव्ही नरसिंह राव
2 - डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबत मौलाना अबुल कलाम आझाद
3 - लाल बहादूर शास्त्री यांच्यासोबत डॉ.राजेंद्र प्रसाद
4 - भगतसिंग यांच्यासोबत गोपाळ कृष्ण गोखले
5 - पंडित जवाहरलाल नेहरूंसोबत सरदार वल्लभभाई पटेल
6 - लाला लजपत राय यांच्यासोबत महात्मा गांधी
7 - रवींद्र नाथ टागोर यांच्यासोबत सुभाषचंद्र बोस
8 - पोस्टरमध्ये सरोजिनी नायडू देखील आहेत

पोस्टर इनोव्हेशनबद्दल कोणाचे काय मत
पक्षाने या मोठ्या-जुन्या नेत्यांची आणि स्वातंत्र्यसैनिकांची नेहमीच आठवण ठेवली आहे. स्वातंत्र्यलढ्यात भाजप आणि आरएसएस दूर-दूरपर्यंत दिसले नाहीत. आता बोलत राहतात आणि आरोप करत राहतात. अजय माकन, राज्य प्रभारी

भाजप राष्ट्रवादाचा दिखावा करते. आमच्या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी बलिदान दिले. तेव्हा संघ आणि भाजपचे कोणते नेते सामील झाले? आमचे नेते सदैव स्मरणात राहतील. मल्लिकार्जुन खरगे, ज्येष्ठ काँग्रेस नेते

नेहरू-गांधी घराण्याच्या छायेतून बाहेर पडण्याचा काँग्रेसचा हा अयशस्वी प्रयत्न आहे. काँग्रेसने सुभाषचंद्र बोस यांना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष होण्यापासून रोखले. नरसिंह राव यांना जो आदर मिळायला हवा होता तो त्यांना कधीच दिला गेला नाही. महापुरुषांचे त्यांच्या नेत्यांसह पोस्टर लावणे हा केवळ काँग्रेसचा दिखावा आहे. घराणेशाहीचेच पालनपोषण करण्याचा आतून हेतू आहे. सतीश पुनिया, प्रदेशाध्यक्ष भाजप

बातम्या आणखी आहेत...